मुंबई : बॉलिवूडचा 'पॉवरहाऊस' अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि प्रतिभावान अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १४ दिवसांत कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. रणवीर सिंहने साकारलेला 'हमजा' आणि अक्षय खन्नाने साकारलेला गँगस्टर 'रहमान डकैत' या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. परिणामी, हा सिनेमा आता ५०० कोटींच्या ऐतिहासिक क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे तिकीट 'वेटिंग' किंवा 'RAC' असल्यास ते ...
विक्रमी कमाईचा प्रवास
View this post on Instagram
५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी २८ कोटींची दमदार सलामी दिली होती. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने एकूण २०७.२५ कोटींची कमाई केली. मात्र, सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत प्रचंड वाढ पाहायला मिळाली. सहसा दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे कलेक्शन कमी होते, पण 'धुरंधर'ने ९ व्या दिवशी ५३ कोटी आणि १० व्या दिवशी ५८ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करून सर्वांनाच थक्क केले. १४ व्या दिवसाच्या अर्ली ट्रेंड्सनुसार, सिनेमाने आतापर्यंत एकूण ४५७.२२ कोटींचा टप्पा गाठला आहे.
दिग्गज सिनेमांना टाकले मागे: 'धुरंधर'ने आपल्या वेगामुळे भारतीय सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड्स धुळीस मिळवले आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या कलेक्शनच्या बाबतीत 'धुरंधर'ने 'पुष्पा २' (१९६.५० कोटी), 'स्त्री २' (१४१.४० कोटी), आणि चक्क 'बाहुबली २' (१४३.२५ कोटी) यांनाही मागे टाकले आहे. अवघ्या पाच दिवसांत २०० कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाने दाखवून दिले आहे की, जेव्हा आशय आणि सादरीकरण उत्तम असते, तेव्हा प्रेक्षक रेकॉर्ड्सचा पाऊस पाडतात.
सध्याच्या ट्रेंडनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत हा सिनेमा ५०० कोटींचा आकडा सहज पार करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदर्शनानंतर दोन आठवडे उलटूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झालेला नाही, हे या सिनेमाचे मोठे यश मानले जात आहे.






