Friday, December 19, 2025

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची निवडणुकीनंतर होणार डागडुजी

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची निवडणुकीनंतर होणार डागडुजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अनेक कठडे आणि बेंचेस तुटलेल्या अवस्थेत असून विद्युत दिव्यांची व्यवस्थाही योग्य नसल्याची पाहणी खुद्द महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी केल्यानंतर आता ही सर्व कामे येत्या निवडणुकीनंतर केली जाणार आहेत . छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची डागडुजीच्या कामांची सर्वप्रकारची प्रक्रिया पूर्ण केली गेल्याने या कामांना निवडणुकीनंतर सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे .

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सकाळी व सायंकाळी चालण्याकरिता, धावण्याकरिता, व्यायामाकरिता व खेळण्याकरिता अनेक नागरिक येत असतात. तसेच याठिकाणी नागरिकही फिरण्यास येत असत असतात. याठिकाणी संपूर्ण कट्टा काही वर्षांपूर्वी सुशोभित करण्यात आला होता . या कट्ट्यावर विविध रंगसंगती असलेल्या चौकोनी आकाराचे तुकडे(चिप्स) लावण्यात आले आहेत. ते बदलून पूर्वीसारखा कट्टा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क) याठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी २९ जुलै २०२५ रोजी भेट दिली. मैदान, पदपथ आणि परिसराच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांशी गगराणी यांनी संवाद साधला. मैदान परिसरात सुधारणा तसेच नियमित देखभाल, दुरूस्ती तसेच स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात परिसरातील कट्ट्यांची दुरूस्ती करतानाच पुरेशा प्रकाश व्यवस्थेच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गगराणी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुषंगाने या जी उत्तर विभागामार्फत, छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर येथील कठडे,बेंचेंस तसेच झाडांभोवतीचे कठडे व विद्युत कामे पार हाती घेण्यात येणार आहे . त्यासाठी १ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे . ही सर्व कामे निवडणुकीनंतर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर होणारे कार्यक्रम

०१ मे महाराष्ट्र दिन,

१५ ऑगस्ट स्वातंत्र दिन,

२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन),

०६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन,

१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती

विविध राजकीय पक्षांचे मेळावे,कार्यक्रम

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >