मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs Deshpande, अखेर हि वेब सिरीज आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित यांनी २०२२ मध्ये 'द फेम गॅमे ' ह्या वेब सिरीज मध्ये उत्कृष्ट काम केले होते . यामुळेच Mrs Deshpande या वेब सिरीज साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
माधुरी दीक्षित (Mrs Deshpande) हि वेब सिरीज १९ डिसेंबर २०२५ ला हॉटस्टार वरती रिलीझ होणार असून या वेब सिरीज मध्ये माधुरी दीक्षित एका वेगळ्याच रूपात दिसणार आहे. ही सिरीज क्राइम आणि थ्रिलर असून, माधुरी दीक्षित यात सीरिअल किलरची भूमिका साकारणार आहे, आजपर्यंत साकारलेल्या सोज्वळ भूमिकांपासून थेट सिरीअल किलर ची भूमिका खूपच आगळी वेगळी असणार आहे.
या सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे. ही सीरिज फ्रेंच मिनीसीरिज 'ला मांटे'चे अधिकृत रूपांतरण आहे. 'ला मांटे' ही सीरिजची निर्मिती एलिस चेगरे-ब्रेग्नोट, निकोलस जीन आणि ग्रेगोइरे डेमाइसन यांनी केली होती. ह्या सिरीज चे एकूण ६ एपिसोड आहेत आणि ते एकत्रच म्हणजेच १९ डिसेंबर मध्य रात्री रिलीझ होणार आहे. या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितसोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही महत्त्वाची भूमिका साकारतोय. तर प्रियांशु चटर्जी आणि दीक्षा जुनेजा हे कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.






