शिस्त आणि काटेकोर नियमपालनाची वर्षपूर्ती...

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने १९ डिसेंबर, २०२४ रोजी सभापतीपदी एकमताने निवड केली. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेल्या योगदानासंदर्भात विशेष लेख...


प्राध्यापक असल्याने शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन, हे सभापती महोदयांचे गुणविशेष सभागृह कामकाजाचे संचालन करताना सर्व सन्माननीय सदस्यांना विशेषत्वाने जाणवतात. मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळेच त्यांचा 'हेडमास्तर' असा आदराने उल्लेख केला आहे. एकमताने सभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन केले आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यावेळी सभापतींनी क्यू बी बी सी (Q B B C) ही विधान परिषद कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी चतु:सूत्री जाहीर केली.


१) क्यू - म्हणजे क्वेश्चन अवर अर्थात प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त प्रश्न पुकारले जातील, एका तासात जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून लोकहिताच्या दृष्टीने न्याय मिळेल याबाबतच्या कार्यवाहीला
प्राधान्य देणे.


२) बी - म्हणजे बिल. विधेयक संमत होताना त्यावर विधान परिषदेत परिपूर्ण चर्चा व्हावी. हे सभागृह ज्येष्ठांचे आहे, त्यामुळे विद्वतचर्चा, विचारमंथन याद्वारे कायदा निर्मितीची प्रक्रिया पूर्ण व्हावी. कायदेमंडळाचे मुख्य कार्य कायदे करणे हे असल्याने कोणतेही विधेयक चर्चेविना मंजूर केले जाऊ नये! (नो बिल शुल्ड बी पास्ड विदाउट डिसकशन !)


३) बी – बजेटरी प्रोसेस…... अर्थसंकल्पीय प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असलेल्या सभागृहातील चर्चेप्रसंगी सन्माननीय सदस्यांचा सहभाग आणखी वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करणे.


४) सी – सी फॉर कमिटी…... संसदीय लोकशाहीचा समितीपद्धती हा आत्मा आहे, असे म्हटले जाते. विधिमंडळाच्या समित्या या मिनी विधान मंडळ म्हणून काम करीत असतात, ही पद्धती आणखी प्रभावी करण्यावर भर देणे.


सभापतींनीं हाती घेतलेल्या या क्यूबीबीसीचे विधायक दृश्य परिणाम अधिवेशानांत दिसून येत आहेत. सभागृह सुरू होण्याअगोदर सर्वपक्षीय गटनेत्यांची नियमित बैठक घेणे हा शिरस्ता ते राबवित असल्याने सभागृह कामकाजात अधिक समन्वय आणि सौहार्दपूर्ण वातावरण दिसत आहे.


पेपरलेस डेमोक्रसी, वन नेशन वन प्लॅटफॉर्म, कायदा निर्मितीप्रक्रियेत जनतेचा अधिकाधिक सहभाग, लोकनियुक्त प्रतिनिधींची सभागृहे जनतेप्रति अधिकाधिक उत्तरदायी होणे, याबाबतची लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांची संकल्पना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकियेद्वारे पुढे नेत आहेत. पटणा येथे झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी – "भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीसाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान" या विषयावर झालेल्या विचारमंथनात सहभाग घेतला. जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्या दृष्टीने भक्कम आधारशिला तयार करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी या परिषदेमध्ये बोलतांना नमूद केले.


विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त सभापतींच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात समारंभपूर्वक करण्यात आले. फेब्रुवारी, २०२५ मध्ये सभापती आणि अध्यक्ष यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विधिमंडळातील दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी "प्राईड" संस्था, संसद भवन, नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. दोनदिवसीय अभ्यासवर्गातील मार्गदर्शनाचा सन्माननीय सदस्यांना खूप लाभ झाला.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च, २०२५ मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभिवादन प्रस्ताव घेण्यात यावा, अशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी मांडली आणि त्यानुसार दोन्ही सभागृहांनी या प्रस्तावाच्या अानुषंगाने या थोर, कर्तबगार, लोककल्याणकारी महिला राज्यकर्तीच्या प्रेरणादायी स्मृतीस मानवंदना अर्पित केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील हा आणखी एक गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.


सभापतींच्याच पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्म ठिकाण चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे ६ मे, २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. अशा प्रकारे राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या निमित्ताने छोट्या गावात येण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. जागतिक स्तरावर चोंडी हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून लवकरच नावारूपाला आलेले आपल्याला बघायला मिळेल. सभापतींना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा...


- निलेश मदाने
जनसंपर्क अधिकारी

Comments
Add Comment

कौटुंबिक आघात : मनावर साचलेला भावनिक त्रास

कौटुंबिक आघात किंवा फॅमिली ट्रॉमा म्हणजे असा भावनिक आणि मानसिक त्रास, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित

मैत्रीचा नवा अध्याय

कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी भारत-रशिया संबंधांमध्ये सातत्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात

लढा ससून डॉक वाचवण्याचा

मुंबई शहराच्या वाढत्या जडणघडणावेळी इतर वास्तूंप्रमाणेच एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कुलाब्यातील ससून डॉक आज

विकासाचे महामार्ग...

देशात रस्ते विकासाला गती देण्यात आली आहे. एकाच दिवशी जास्त किलोमीटर रस्त्याचे काम करण्याचा विक्रम नोंदवला गेला

निवडणूक सुधारणा

सुमारे ५० पेक्षाही जास्त वर्षांपूर्वी, भारतीय राजकारणाच्या एका ज्येष्ठ ब्रिटिश अभ्यासकांनी असे उपरोधिक

चक्राकार उपाय नकोत!

वाघ जितका गरजेचा आहे तितकाच माणूसही. गावाकडचा सर्वसामान्य माणूस प्रचंड तणावात जगतोय. शेतकरी, मजूर, आदिवासी बांधव