Thursday, December 18, 2025

बाजारात शॉर्ट पोझिशनचा टेक्निकल 'गेम' पुन्हा एकदा बाजार किरकोळ घसरणीवर बंद! 'हे' आहे पडद्यामागचे बाजार विश्लेषण

बाजारात शॉर्ट पोझिशनचा टेक्निकल 'गेम' पुन्हा एकदा बाजार किरकोळ घसरणीवर बंद! 'हे' आहे पडद्यामागचे बाजार विश्लेषण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ घसरण झाली आहे. सेन्सेक्स ७७.८४ अंकानी घसरला असून ८४४८१.८१ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३ अंकाने घसरत २५८१५.५५ पातळीवर स्थिरावला आहे. तरीही बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात स्थिरावली असली असूनही पुन्हा एकदा बाजारात शॉर्ट पोझिशन वाढवल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असल्याने आज बँक निर्देशांकातील अपेक्षित घसरण रोखली गेली असून अखेरच्या रूपयात मोठी रिकव्हरी झाली ज्यामुळे घरगुती गुंतवणूकदारांनी आज आपली रोख विक्री मर्यादित राखली. घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे बाजारात त्याचा निश्चितच फायदा झाला असला तरी भारत युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अनिश्चितता तसेच ऑटो, मिडिया, तेल व गॅस शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. दरम्यान आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण मर्यादित राहिली आहे.

याशिवाय बँक निर्देशांकाही सेन्सेक्स बँक किरकोळ वाढीसह बंद झाला असून बँक निफ्टीत किरकोळ घसरण झाली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,ऑटो शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगमध्ये वाढ झाल्याने अस्थिरतेचा फटका ऑटो शेअर्समध्ये बसला होता ज्यामुळे सलग चौथ्या सत्रात ऑटो शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या फटक्यामुळे तेल व गॅस शेअर्समध्ये घसरण झाली. आगामी युएस बाजारातील महागाईतील आकडेवारीची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने आगामी आशियाई बाजारातही त्यांचे पडसाद उमटू शकतात. चलनविषयक धोरणाच्या भविष्यातील मार्गाबद्दल अनिश्चितता अस्थिरतेत भर घालत आहे. स्थानिक पातळीवर, डेरिव्हेटिव्ह्ज डेटा एकत्रीकरण टप्प्याकडे निर्देश करतो. तथापि कमी अस्थिरता आणि जास्त विक्री निर्देशक सूचित करतात की अधूनमधून शॉर्ट-कव्हरिंग रॅली नाकारता येत नाहीत असे तज्ञांचेही मत आहे.

खासकरुन आशिया-पॅसिफिक प्रदेशातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात फंडामेंटल व टेक्निकल कमकुवत पातळीवर व्यवहार करत आहेत. उदाहरणार्थ जपानमध्ये आलेल्या आकडेवारीनंतर जपानचा निक्केई तोट्यात सुरू असताना तंत्रज्ञान आणि एआय स्टॉक्समध्ये नफाबुकिंग व एका अहवालाच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भांडवली खर्चातून परताव्यावर पुन्हा वाढलेली चिंता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अमेरिकेच्या प्रमुख चलनवाढीच्या डेटापूर्वी बाजारातील सहभागी देखील सावध अधिक होत आहेत याचाही फटका भारताला बसला. दुपारच्या सत्रात सकाळी सावरलेले बाजार पुन्हा एकदा खाली सपोर्ट लेवल मिळण्यास कमी पडले असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा आणखी फटका बसला. मिडकॅपमध्येही किरकोळ घसरण झाली असताना लार्जकॅपचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०३%)सह निकेयी २२५ (०.८३%), कोसपी (१.५५%), सेट कंपोझिट (०.५४%), जकार्ता कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून केवळ हेंगसेंग (०.०५%), शांघाई कंपोझिट (०.१६%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.३१%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.१६%), नासडाक (१.८०%) निर्देशांकात घसरण झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (७.३५%),एचडीएफसी एएमसी (७.१५%), रिलायन्स पॉवर (५.८६%), हिंदुस्थान कॉपर (५.२३%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (४.०६%), पीबी फिनटेक (३.९३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण हिताची एनर्जी (५.१७%), ओला इलेक्ट्रिक (४.९८%), सिमेन्स इंजिनिअरिंग (४.९५%), रामकृष्ण फोर्ज (३.७५%), एबी लाईफस्टाईल (३.६९%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.५१%), एमआरपीएल (३.०७%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.०२%), कमिन्स इंडिया (२.८२%) निर्देशांकात घसरण झाली आहे.

बँक निफ्टीबाबत भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' बँक निफ्टी अजूनही एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहे; तथापि, हा निर्देशांक त्याच्या महत्त्वाच्या अल्प-मुदतीच्या १० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) जवळ पुन्हा पुन्हा विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहे जे बाजारातील मंदीचा कल दर्शवते. जर निर्देशांकाने ५८७०० येथील रेंज सपोर्ट तोडला आणि त्याखाली क्लोजिंग दिले, तर घसरणीचा धोका वाढू शकतो. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार पातळी (Immediate Resistance) ५९१५० पातळीवर आहे, तर आधार पातळी ५८७०० पातळीच्या जवळ आहे. ५८७०० पातळीच्या खाली निर्णायक क्लोजिंग झाल्यास ५८३५० पातळीपर्यंत आणखी घसरण होऊ शकते, जिथे ५०-दिवसांचा एसएमए (SMA) आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिर व्यवहार झाले, ज्यात लार्ज-कॅप शेअर्सनी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या तुलनेत पिछाडी घेतली. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, सुरुवातीच्या तेजीला व्हॅल्यू बाइंग आणि मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आधार मिळाला. तथापि, अमेरिका-भारत संभाव्य व्यापार कराराबद्दलच्या अनिश्चिततेमुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला, ज्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात नफावसुली झाली. क्षेत्रनिहाय विचार केल्यास,आयटी आणि वित्तीय सेवा क्षेत्रांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले, तर ऑटो, तेल आणि वायू, रसायने आणि फार्मा क्षेत्रांमध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली. पुढे पाहता, बाजाराला स्पष्ट दिशादर्शक संकेतांसाठी अमेरिकेचा मुख्य चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीच्या दाव्यांची आकडेवारी, तसेच बँक ऑफ इंग्लंड, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ जपानच्या व्याजदर निर्णयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.'

बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' निफ्टीमध्ये कमजोरी कायम आहे, कारण निर्देशांकाला तासाभराच्या चार्टवर २००-डीएमए (Daily Moving Average DMA) पातळी पुन्हा मिळवण्यात अपयश आले आहे आणि बाजारातील मंदीचे वातावरण भारतीय इक्विटींना खाली खेचत आहे. सलग खालच्या शिखरांची निर्मिती मंदीच्या दृष्टिकोनाला आणखी बळकटी देत आहे. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय (Relative Strength Index RSI) बेरिश क्रॉसओव्हरमध्ये आहे आणि तो देखील खालची शिखरे तयार करत आहे, जे गती कमकुवत होत असल्याचे दर्शवते. बाजाराचा कल कमकुवतच राहिला आहे आणि २५७०० ची पातळी ब्रेकडाउनसाठी असुरक्षित दिसत आहे. २५७०० पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास करेक्शनच्या पुढील टप्प्याला वेग येऊ शकतो. वरच्या बाजूला (Upside) २५९०० पातळीच्या आसपास प्रतिकार पातळी आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >