Thursday, December 18, 2025

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र उलथापालथ सेन्सेक्स व निफ्टीत घसरण तरी गुंतवणूकदारांसाठी जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र उलथापालथ सेन्सेक्स व निफ्टीत घसरण तरी गुंतवणूकदारांसाठी जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी

मोहित सोमण:सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. काल सकाळच्या तेजीनंतर टेक्निकल कारणाने व अस्थिरतेने बाजार घसरले होते आजही मरगळ कायम असल्याने बाजारात संमिश्र प्रतिसाद अपेक्षित होता. सकाळी सेन्सेक्स १७०.३१ व निफ्टी ४३.६५ अंकाने घसरला आहे. कालची पीएसयुतील रॅलीही थंडावली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. व्यापक निर्देशांकात नेक्स्ट ५० (०.६३%), मायक्रोकॅप २५० (०.७९%), स्मॉलकॅप २५० (०.५५%) निर्देशांकात झाली आहे. तर सकाळच्या सत्रात क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५० निर्देशांकात वाढ झाल्याने काही पातळीवर बाजाराला आधार मिळाला असून सर्वाधिक घसरण ऑटो (१.२३%), मिडिया (०.७८%), फार्मा (०.८५%),मिड स्मॉल हेल्थकेअर (०.८६%) समभागात झाली आहे.

गिफ्ट निफ्टीत पहाटे घसरण झाल्यानंतर युएस पेरोल कमकुवत आकडेवारीनंतर आता गुंतवणूकदारांचे शटडाऊन नंतर प्रथमच जाहीर केल्या जाणाऱ्या आगामी महागाई आकडेवारीमुळे अस्वस्थता कायम आहे. तोच कल आशियाई बाजारातील सुरु असून आजचे बाजार रूपयातील कामगिरी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ इंद्रप्रस्थ गॅस (६.३०%), निप्पॉन लाईफ (६.२२%), नुवामा वेल्थ (४.१७%), रिलायन्स पॉवर (३.८८%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.१९%), एचडीएफसी एएमसी (२.८०%), श्रीराम फायनान्स (२.७१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण अक्झो नोबेल (१४.२६%), ओला इलेक्ट्रिक (७.५७%),आयओबी (६.९५%), सारेगामा इंडिया (५.४२%), रामकृष्ण फोर्ज (५.६०%), प्राज इंडस्ट्रीज (४.७४%), कोचिन शिपयार्ड (४.४५%) समभागात झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी आजची स्ट्रॅटेजी काय?

चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे - सध्याची अस्थिरता आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, व्यापाऱ्यांना निवडक राहण्याचा आणि घसरणीच्या वेळी खरेदी करण्याची रणनीती अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. योग्य लिव्हरेज, कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस आणि टप्प्याटप्प्याने नफा-वसुली करण्याची शिफारस केली जाते. जागतिक संकेतांचे आणि महत्त्वाच्या तांत्रिक स्तरांचे बारकाईने निरीक्षण करून नवीन लाँग पोझिशन्स केवळ २६१०० च्या वर सातत्यपूर्ण ब्रेकआउट झाल्यावरच विचारात घेतल्या पाहिजेत. ' असे म्हणाल्या आहेत.

जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार -

'मेरिकेच्या बाजारात एआय (AI) संबंधित व्यापारात कमकुवतपणा येण्याचा कल वाढत आहे. हा कल २०२६ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, आणि याचा फायदा भारतासारख्या गैर-एआय (non-AI) बाजारांना होईल.कालच्या व्यापारातून एक महत्त्वाचा निष्कर्ष हा निघतो की, एफआयआय (FII) खरेदी आणि निव्वळ संस्थात्मक खरेदी असूनही बाजार खाली घसरला. याचे कारण कदाचित एफआयआयने बाजारात त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स वाढवणे हे असू शकते. याचा अर्थ नजीकच्या काळात एफआयआय ' तेजी आल्यावर विक्री करा' (sell on rally) या रणनीतीचा अवलंब करतील.

आता बाजारात एक चिंता आहे की, जपानची मध्यवर्ती बँक आज आक्रमक संदेशासह व्याजदर वाढवेल का. जर असे झाले, तर त्यामुळे 'येन कॅरी ट्रेड'मध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे एफआयआयद्वारे आणखी विक्री होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी आता बाजारातील घसरणीच्या वेळी उच्च दर्जाचे आणि योग्य मूल्यांकनाचे शेअर्स खरेदी करून साठवणे आवश्यक आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >