Thursday, December 18, 2025

जय माता दी, शिवाभिषेक आणि बरचं काही... मेस्सीला भारतीय संस्कृतीची भुरळ

जय माता दी, शिवाभिषेक आणि बरचं काही... मेस्सीला भारतीय संस्कृतीची भुरळ

जामनगर: दिग्गज फुटबॉल पट्टू लिओनेल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्टात आला असून तो आपल्या मायदेशी परतला आहे. दोन दिवसांच्या भारत भेटी दरम्यान अनेक शहरांना आणि सेलिब्रिटींना त्याने भेट दिली. यामध्ये अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वनताराला मेस्सीने दिलेली भेट महत्त्वाची आणि विशेष आकर्षण ठरली. वनतारामध्य अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी मेस्सीचे स्वागत केले. यानंतर मेस्सीने सनातन धर्म व हिंदू चालरितींनुसार महाआरती आणि हिंदू देवीदेवतांची पूजा आणि शिवाभिषेक केला. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला असून व्हायरल होत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Vantara (@vantara)

वनताराच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लिओनेस मेस्सीच वनतारामध्ये कसे स्वागत करण्यात आले, हे दाखवण्यात आले होते. तसेच मेस्सीने यावेळी गणपत्ती बाप्पांसमोर मस्तक टेकवून घेतलेले दर्शन, त्यानंतर आरतीचे ताट हातात घेऊन देवी मातेची केलेली पुजा, मेस्सीने दिलेले जय मातादीचे नारे हे सर्व दृष्य पाहून अनेकांना आनंद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीदरम्यानच्या त्याच्या कृतींमधून तो ज्या नम्रतेसाठी आणि मानवतावादी मूल्यांसाठी ओळखला जातो, तीच मूल्ये दिसून आली.

दरम्यान मेस्सीच्या वनतारा भेटीबाबात वनताराकडून माहिती देण्यात आली आहे. वनताराने सांगितले की, जागतिक फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने वनताराला विशेष भेट दिली. सनातन धर्मानुसार देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन भेटीची सुरुवात करण्याची परंपरा आहे. मेस्सीच्या भेटीतून हीच सांस्कृतिक भावना दिसून आली, कारण त्याने पारंपरिक हिंदू विधींमध्ये सहभाग घेतला आणि वन्यजीवांचा आश्रय पाहिला आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांशी संवाद साधला.

पुढे वनताराने म्हटले आहे की, मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांचेही भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसंगीत, देवदेवतांचे आशीर्वाद आणि पवित्रतेचे प्रतीक असलेल्या फुलांची वृष्टी आणि पारंपरिक महाआरती करण्यात आली. यावेळी मेस्सीनेही मंदिरातील महाआरतीमध्येही सहभाग घेतला. त्याने अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिवाभिषेक केला. सर्व जीवांबद्दल आदर राखण्याच्या भारताच्या कालातीत नीतिमूल्यांनुसार त्याने जागतिक शांतता आणि एकतेसाठी प्रार्थनाही केली.

Comments
Add Comment