Thursday, December 18, 2025

पैसे तयार ठेवा! कार मार्केट हदरवायला निसान तयार! आली नवी बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइटची झलक

पैसे तयार ठेवा! कार मार्केट हदरवायला निसान तयार! आली नवी बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइटची झलक

गुरुग्राम: पैसे तयार ठेवा कारण निसान एक आपली दमदार चारचाकी बाजारात लवकरच दाखल करणार आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला ही गाडी बाजारात लाँच करण्याची घोषणा केली असून अद्याप किंमत, व इतर सखोल माहिती अद्याप प्रकाशित केलेले नाही. नुकताच कंपनीने कारची झलक दाखविण्यासाठी एक टीजर प्रदर्शित केलेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निसानची सातआसनी चारचाकी (कार) बी-एमपीव्ही 'ग्रॅव्हाइट' या नावाने २०२६ च्या सुरुवातीला लॉन्च केली जाईल. निसानने आपल्या ध्येयधोरणात मोठ्या प्रमाणात बदल केले होते त्याच्याशीच सुसंगत भारतातील ब्रँडच्या नवीन आणि धोरणात्मकदृष्ट्या तयार केलेल्या उत्पादन मालिकेअंतर्गत सादर केले जाणारे पहिले उत्पादन आहे असे कंपनीने म्हटले.

जुलै २०२४ मध्ये निसान मोटर इंडियाच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन योजनेतील दुसरे मॉडेल म्हणून घोषित केलेली ही गाडी नव्या अपग्रेडसह बाजारात येणार आहे. उत्पादन रोडमॅपमध्ये २०२६ च्या सुरुवातीला ग्रॅव्हाइटचे लॉन्च त्यानंतर २०२६ च्या मध्यभागी टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला ७-सीटर सी-एसयूव्हीचा समावेश आहे अशा उत्पादनांचा आगामी प्रोडक्ट पोर्टफोलिओत समावेश असेल असे कंपनीने म्हटले.

‘ग्रॅव्हिटे’ हे नाव ‘ग्रॅव्हिटी’ (गुरुत्वाकर्षण) या शब्दापासून प्रेरणा घेते. त्यामुळे हे कंपनीने नवे नाव उत्पादनाला कायम ठेवले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

महत्वपूर्ण झलक-

मॉड्युलॅरिटी आणि आरामदायक रचना -

ग्रॅव्हिटे केबिनमधील प्रशस्त जागेसाहित बाजारात दाखल होईल. उत्पादक निसानने दिलेल्या माहितीनुसार, यातील प्रत्येक घटकातील पैलू मल्टीपर्पज व सहज वापरासाठी बारकाईने डिझाईन केलेला आहे. प्रवाशांच्या आणि मालाच्या बदलत्या गरजांनुसार सहजपणे जुळवून घेणाऱ्या अल्ट्रा-मॉड्युलर सीटिंगपासून ते स्मार्ट जागेच्या वापरापर्यंत दैनंदिन प्रवास आणि कुटुंबासोबतच्या लांबच्या रोड ट्रिप्स दोन्ही तितक्याच सहजपणे शक्य होईल असा दावा कंपनीने केला. ग्रॅव्हिटे चेन्नईमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केली जाईल. निसानच्या लाइनअपमधील दुसरे महत्त्वाचे मॉडेल म्हणून, ग्रॅव्हिटे हे भारतीय बाजारात दाखल होईल.

डिझाइन आणि प्रेरणा-

आकर्षक सी-आकाराची फ्रंट ग्रिल ग्रॅव्हिटेचे आकर्षक वैशिष्ट्य असेल

कंपनीच्या दाव्यानुसार ग्रॅव्हिटे हे विशिष्ट हुड ब्रँडिंगसह मागील-दरवाजा बॅजिंग असणारी सेगमेंटमधील पहिली कार असणार आहे.

मागील भागात निसानच्या वैशिष्ट्यपूर्ण सी-आकाराच्या इंटरलॉक थीमचा वापर

MPV उपस्थिती

निसान एएमआयईओ (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया) चेअरपर्सन, मॅसिमिलियानो मेसिना म्हणाले आहेत की,' भारत हा एएमआयईओच्या कामगिरीमध्ये एक महत्त्वाचा योगदानकर्ता आहे आणि निसान मोटर इंडिया आमच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आर्थिक वर्ष २५ मध्ये, आम्ही आमच्या व्यावसायिक कामकाजाला बळकटी दिली आहे, आमचा पोर्टफोलिओ विस्तारला आहे आणि आमच्या २०२४ च्या उत्पादन योजनेअंतर्गत दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण केली आहेत. आगामी उत्पादनांची श्रेणी जी जागतिक दृष्टिकोनातून तयार केली गेली आहे, परंतु भारतीय ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत आहे . या गतिमान बाजारपेठेप्रती आमची बांधिलकी दर्शवते. भारतात विकसित केलेल्या आणि भारतासाठी बनवलेल्या नवीन मॉडेल्ससह, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीमुळे, भारत हा निसान अलायन्ससाठी वाढीचा चालक आणि केंद्रस्थान दोन्ही आहे. 'ग्रॅव्हाइट'च्या अनावरणाने आमची सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते आणि भविष्याबद्दलचा आमचा आत्मविश्वास दृढ होतो.'

बाजारातील अहवालातील माहितीनुसार, काय असतील आणखी फिचर्स?

ग्राहक ५-स्पीड मॅन्युअल किंवा ५-स्पीड एएमटी युनिटची अपेक्षा करू शकतात. सध्याच्या अहवालांमध्ये या विशिष्ट मॉडेलसाठी सीव्हीटी (Continuosly Variable Transmission) गिअर बॉक्स पर्यायाचा कोणताही उल्लेख अद्याप केलेला नाही.

निसान ४ ते ५ (XE, XL, XV, XV Premium) या व्हेरिएंटमध्ये येऊ शकते असे प्रसारमाध्यमांनी सांगितले.

व्हेरिएंट: बेस व्हेरिएंट कारची किंमत साधारणतः ६ ते ६.२० लाखापासून रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक हॅचबॅक गाड्यांपेक्षा याची किंमत कमी असेल.

७ आसनासह गाडी बाजारात येणार

फूल लोडेड एएमटी आवृत्तीची किंमत अंदाजे ९ ते ९.५० लाख रुपयांपर्यंत बाजारात येण्याची शक्यता

उपलब्ध माहितीनुसार, अधिकृत बाजारपेठेतील लाँच Q1 २०२६ (पहिल्या तिमाहीत) अपेक्षित 

प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाँचनंतर थोड्याच वेळात अधिकृत बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक अधिक माहितीसाठी www.nissan.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकतील असे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >