Thursday, December 18, 2025

चारकोपमध्ये होणार भाजपचे रेकॉर्ड...

चारकोपमध्ये होणार भाजपचे रेकॉर्ड...

िचत्र पालिकेचे चारकोप िवधानसभा

सचिन धानजी

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील चारकोप विधानसभा भाजपचा मोठा बालेकिल्ला असून या विधानसभेत एकमेव उबाठाचा नगरसेवक आहे. तर भाजपचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे एकमेव प्रभाग क्रमांक १९ हा उबाठाचा असला तरी भविष्यात याठिकाणी शिवसेनेला जाण्याची शक्यता कमी असून या ठिकाणच्या या विधानसभेतील सर्वच जागा या भाजप लढवण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे विधानसभेतील सर्वच जागा लढवल्या जाणाऱ्या भाजपचा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असेल.

चारकोप विधानसभेत सन २००९ पासून भाजपचे आमदार म्हणून योगेश सागर निवडून येत आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत युती न झाल्याने भाजपने सहाही जागेवर उमेदवार उभे केले आणि पाच जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणले. यातील एकमेव प्रभाग १९ मध्ये उबाठाच्या शुभदा गुडेकर या निवडून आल्या होत्या; परंतु आता शुभदा गुडेकर या वयोमानानुसार निवडणूक न लढवता आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवत असल्याने या प्रभागात भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागी भाजपचे उमेदवार उभे करून सहाही नगरसेवक या विधानसभेत निवडून आणण्याचे रेकॉर्ड भाजपचे आमदार योगेश सागर यांना करण्याची संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग १९ मध्ये उबाठाची माजी नगरसेविका असल्याने ही जागा शिवसेनेला सोडली जाते की भाजप स्वत: लढवते याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीत चारकोप विधानसभेत मिळालेल्या मतदानाची आकडेवारी

  •  पीयूष गोयल, भाजप : १,२५,६३५
  • भूषण पाटील, काँग्रेस :४६,५४९
  • चारकोप विधानसभेचा निकाल
  • योगेश सागर,भाजप : १,२७,३५५
  • यशवंत सिंह, काँग्रेस : ३६,२०१
  • दिनेश साळवी, मनसे : १५,२००
  • प्रभाग क्रमांक १९ (ओबीसी महिला)

हा प्रभाग सर्वसामान्य महिला करता आरक्षित होता. परंतु हा प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. या प्रभागातून उबाठाच्या शिवसेनेच्या शुभदा गुडेकर या निवडून आलेल्या असल्या तरी आता उबाठाकडून शुभदा गुडेकर या आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. या प्रभागावर भाजपाचा दावा आहे. याप्रभागातून भाजपाच्यावतीने सुलभ जोशी, साळुंखे आणि रेश्मा टक्के यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराची चर्चा नाही.

  • प्रभाग क्रमांक २० (सर्वसाधारण)

हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण होता आणि पुन्हा एकदा प्रभागाचे आरक्षण समान राहिले आहे. या प्रभागातून भाजपाचे बाळा तावडे हे निवडून आले होते. त्यामुळे भाजपाच्यावतीने पुन्हा बाळा तावडे यांचे नाव स्पर्धेत आहे. त्यामुळे बाळा तावडे जिल्हाध्यक्ष असल्याने स्वत: निवडणूक लढवतात की दुसऱ्याला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर उबाठाकडून राजन निकम आणि मनसेकडून दिनेश साळवी यांचे तर काँग्रेसकडून विनायक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

  • प्रभाग क्रमांक २१ (महिला)

हा प्रभाग ओबीसी महिलाकरता आरक्षित होता आणि या प्रभागातून प्रथम भाजपाच्या शैलजा गिरकर आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची सुनबाई ऍड प्रतिभा गिरकर विजयी झाल्या होत्या. पण आता हा प्रभाग महिला झाल्यामुळे याठिकाणी भाजपाकडून ऍड प्रतीभा गिरकर यांचे नाव अग्रकमावर आहेत, तसेच याच प्रभागातून क्रांती गिरकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे गिरकर कुटुंबातील कुणाच्या वाट्याला भाजपा उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर उबाठाकडून इच्छुकाचे नाव समोर नसले तरी काँग्रेसकडून मुच्छाला याचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या प्रभागा भाजपा विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे.

  • प्रभाग क्रमांक २२ (सर्वसाधारण)

हा प्रभाग पूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या प्रियंका मोरे या निवडून आल्या होत्या पण आता हा प्रभाग खुला अर्थात सर्वसाधारण झाल्यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या प्रभागातून विद्यमान नगरसेविका प्रियंका मोरे यांच्यासह कमलेश यादव आणि निखिल व्यास यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून आशिष पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द उबाठा अशीच प्रमुख लढत होणार आहे.

  • प्रभाग क्रमांक ३० (सर्वसाधारण )

हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण महिला करता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या लिना देहेरकर या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग आता सर्वसाधारण झाल्यामुळे या प्रभागात भाजपाच्यावतीने लिना देहेरकर यांच्यासह काँग्रेसकडून संतोष राणे हे आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहे. तसचे उबाठाकडून उदय रुघाणी यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे

  • प्रभाग क्रमांक ३१ (महिला)

हा प्रभाग पूर्वी ओबीसी राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाचे कमलेश यादव हे निवडून आले होते. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला असून भाजपाकडून कमलेश यादव यांची मुलगी मनिषा यादव यांना निवडूक रिंगणात आहे. तर या प्रभागावर मनसेचा डोळा असून मनसेचे दिनेश साळवी या प्रभागातून आपली मुलगी मनिषा यांना निवडणूक रिंगणात आणण्याचा विचारात आहे. तर उबाठाकडून ज्योती मोरे यांच्याही नावाची चर्चा आहे.

  • प्रभाग क्रमांक ३२( ओबीसी महिला)

हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता. याप्रभागातून काँग्रेसच्या स्टेफी केणी या निवडून आल्या होत्या. पण पुढे जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये त्या अपात्र ठरल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील तत्कालिन शिवसेनेच्या गीता भंडारी या पुढे ननगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे हा प्रभाग पुन्हा ओबीसी महिलाकरता राखीव झाल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा नाही. तर उबाठाकडून पुन्हा गीता भंडारी यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडूनही पुन्हा अर्चना वाडे यांचेच नाव चर्चेत आहे.

Comments
Add Comment