Thursday, December 18, 2025

पूर्वमुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ दुहेरी बोगदा होणार अधिक प्रकाशमान

पूर्वमुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ दुहेरी बोगदा होणार अधिक प्रकाशमान

विद्युतभाराची क्षमता वाढवणार

मुंबई : मुंबईतील पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वेवरील आणिक पांजरपोळ भुयारी वाहतूक मार्गामध्ये मार्ग दिवे प्रकाशमान नसल्याने याठिकाणी विद्युत व्यवस्था कमजोर असल्याने यामध्ये अंधूक प्रकाश पसरतो. परिणाली या भुयारी वाहतूक मार्गामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यामध्ये विद्युत व्यवस्थेसह आता एक्झॉस्ट प्रणालीही समक्ष केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील पूर्वमुक्त मार्गामध्ये बांधलेले भारतातील पहिले दुहेरी बोगदे ५०५ मीटर उत्तरेकडे आणि ५५५ मीटर दक्षिणेकडे इतक्या लांबीचे तसेच प्रत्येकी १८ मीटर रुंदी आणि ९ मीटर उंचीचे आहेत. हे दुहेरी बोगदे हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने आणिक पांजरपोळ लिंक रोड (एपीएलआर) प्रकल्पाचा भाग म्हणून बांधण्यात आले होते. हे दुहेरी बोगदे त्यानंतर मुंबई महानगरपालिकेस सुपुर्द करण्यात आले आहेत. जून २०१३ मध्ये हा मार्ग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. अशा प्रकारची बोगदा प्रणाली ही शहराच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेली असून ती शहरी वाहतुकीकरिता वापरली जाणारी भारतातील पहिली बोगदा प्रणाली म्हणून ओळखली जाते.

पूर्वमुक्त मार्गाच्या दुहेरी बोगदयांमध्ये कराव्याच्या कामाच्या प्रमाणाची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ परिक्षण केली. या परिक्षणादरम्यान, या ठिकाणी असलेली विद्यमान प्रकाश व्यवस्था आणि इतर विद्युतभार एलटी कनेक्शनवर असल्याचे दिसून आले. विद्यमान विद्युत व्यवस्थेसाठी आवश्यक भार १२५ किलोवॅट आहे. परंतु येथील विद्युतभाराची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन अद्ययावत प्रकाश व्यवस्था आणि एक्झॉस्ट प्रणालीसाठी आवश्यक भार सुमारे ५०० किलोवॅट आणि त्याहून अधिक वाढवण्यात येत आहे. त्यानुसार यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने निविदा मागवून याचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे काम पुढील ९ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >