मोहित सोमण: एक तासात शेअर बाजाराने जबरदस्त कमबॅक केले आहे. एकदम सुरुवातीच्या २०० पेक्षा अधिक पातळीवर घसरला असताना बाजाराने पुनरागमन केल्याने बाजारात सेन्सेक्स व निफ्टीने उसळी घेतली आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४५८० पातळी पार करुन ७३.०७ अंकाने उसळत ८४६३५.६७ पातळीवर उसळला आहे. तर निफ्टी ५० हा ४० अंकांने उसळत २५८६३ पातळीवर पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे निफ्टीने २५८५० पातळीचा 'सेफ' झोनमध्ये परती करण्यास यशस्वी ठरला. त्यामुळे कालच्या घसरणीनंतर मोठ्या प्रमाणात बाजाराने उडी घेतली असून घरगुती गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करुन नफा बुकिंग केल्याचेही बाजारात यावरून स्पष्ट होते. इन्फोसिस, टीसीएस, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या रॅलीचा बाजाराला फायदा झाला असून मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्राईजेस या शेअर्समध्ये झालेल्या किरकोळ घसरणीचा बाजारात परिणाम दिसत आहे.
आज बाजाराने प्रामुख्याने तीन कारणांमुळे पुन्हा कम बॅक केले आहे. ते म्हणजे बाजारातील मजबूत टेक्निकल रिकव्हरी, युएस बाजारातील तंत्रज्ञान शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका म्हणून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय आयटी, एआय शेअर्समध्ये वळवलेले लक्ष, तसेच नफा बुकिंगसाठी वाढववेली खरेदी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रूपया रिकव्हरीमुळे वाढवलेली खरेदी या कारणामुळे बाजार पुन्हा एकदा तेजीकडे झुकत असल्याचे स्पष्ट होते. सकाळच्या सत्रात, वाढलेल्या परदेशी निधी गुंतवणूकीमुळे रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहे तरीही आज रूपयाने वापसी केली असून आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया डॉलरच्या तुलनेत ९०.३५ वर उघडला, ९०.३२ पर्यंत वाढला आणि सकाळच्या सत्रात ९०.३८ पर्यंत पोहोचला होता.कालच्या घसरणीनंतर आज जवळपास ३०० पेक्षा अधिक पातळीवर बाजार सावरल्याने अखेरच्या सत्रातील बाजारातील हालचाल पाहणे गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
एनएसईतही २९५४ शेअरपैकी १०४७ शेअर्समध्ये वाढ झाली असून १८२२ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारातील तेजीचा अंडरकरंट दिसून आला आहे. एनएसईत सकाळी ११ वाजेपर्यंत ३७ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असल्याचेही आकडेवारीत आढळले. मुख्य म्हणजे कालच्या तेजीनंतर बँक निर्देशांकाने सुरूवात कमजोर केली असली तरी पुन्हा एकदा उसळी घेतल्याने बाजार धोकादायक पातळीच्या बाहेर येण्यास मदत झाली. कारण सेन्सेक्स सकाळी ११.१५ वाजेपर्यंत २३५.९४ अंकांने व निफ्टी १६२.२० अंकाने उसळला आहे
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूकीबाबत बोलयचे झाल्यास सलग १४ सत्रांपर्यंत विक्री केल्यानंतर १७ डिसेंबर रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ रोख खरेदी केली होती. यामध्ये एफआयआयने ११७१ कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या असून तर घरगुती देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील ७६८ कोटी रुपयांच्या खरेदीसह बाजाराला पाठिंबा दिला आहे.
सकाळच्या सत्रातील भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) ,तो विक्रमी नीचांकी पातळीजवळ बाजार सत्राच्या सुरुवातीला होता. त्यामुळे कमी होत असलेल्या निर्देशांकातील पातळीमुळे पुन्हा बाजारात स्थिरतेचे संकेत मिळत आहेत. दरम्यान सकाळी ११.१५ वाजेपर्यंत अस्थिरता निर्देशांक ०.०२% घसरला होता.
तेजीचे आणखी महत्वाचे कारण म्हणजे प्रामुख्याने आज घरगुती गुंतवणूकदारांनी टीसीएस, इन्फोसिस शेअर्समध्ये वाढ झाल्याने निर्देशांकातील वेटेज वाढण्यास आज मदत झाली.
तज्ञांचे टेक्निकल विश्लेषण काय?
१) चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड तांत्रिक रिसर्च विश्लेषक आकाश शहा -
सत्रादरम्यान, सेन्सेक्स किंचित नकारात्मक ते स्थिर कलसह मर्यादित ते मध्यम श्रेणीत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे. इंट्राडे रॅलीमध्ये विक्रीचा दबाव येण्याची शक्यता आहे, विशेषतः ८५०००–८५१०० या प्रतिकार पातळीजवळ, जिथे अलीकडील सत्रांमध्ये वाढ सातत्याने रोखली गेली आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या बाजाराची दिशा प्रभावित करत राहू शकतात, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऊर्जा साठ्यांकडून निवडक पाठिंबा मिळू शकतो. दुसरीकडे, ८४०००–८४१०० ही पातळी एक महत्त्वपूर्ण आधार क्षेत्र आहे. या श्रेणीच्या वर टिकून राहिल्यास निर्देशांकाला स्थिरावण्यास मदत होईल तर निर्णायक घसरण झाल्यास इंट्राडेमध्ये आणखी कमजोरी येऊ शकते आणि घसरणीचा टप्पा वाढू शकतो. एकूणच, नजीकच्या काळातील कल अनिश्चित आहे, आणि व्यापाऱ्यांनी सावध राहणे अपेक्षित आहे, तसेच दिवसादरम्यान स्पष्ट दिशानिर्देशांसाठी आधार आणि प्रतिकार पातळीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.'
२) जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स -
'आठवड्याच्या उच्चांकावरून एक टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर, घसरत्या ट्रेंडलाइनच्या दिशेने खाली येत आपण गेल्या शुक्रवारच्या नीचांकी पातळीवर परत आलो आहोत. ही सुरुवातीला २५९८० पातळीच्या दिशेने तेजीची उलटापालट घडवून आणण्याची एक उत्तम संधी आहे. असे असले तरी, २५८५० च्या वर टिकून राहण्यात अपयश आल्यास केवळ २५६५०-३०० किंवा २५१३० पर्यंतच घसरण होणार नाही, तर नजीकच्या काळातील मंदीची पुष्टी देखील होऊ शकते.'
३) चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे -
मागील सत्रात, निफ्टी ५० किंचित सकारात्मक उघडला, परंतु त्यात जवळपास १५८ अंकांची घसरण होऊन तो २५७७० पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे उच्च स्तरांवर नफा-वसुली झाल्याचे आणि खरेदीचा पाठिंबा नसल्याचे दिसून येते. हा निर्देशांक २५७७०–२५८५० पातळीच्या मर्यादेतच व्यवहार करत आहे, जे व्यापाऱ्यांमधील सततची अनिर्णितता दर्शवते. तात्काळ प्रतिकार पातळी २५९५०–२६००० पातळीवर आहे आणि या पातळीच्या वर निर्णायक ब्रेकआउट झाल्यास २६१०० पातळीपर्यंतचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसरीकडे, नजीकच्या काळात २५६५० आणि २५७०० या महत्त्वाच्या आधार पातळी (Support Level) आहेत.
बँक निफ्टीमध्येही उच्च स्तरांवरून घसरण झाली आणि त्याने ५८८०० पातळीच्या जवळ इंट्राडे नीचांकी पातळी गाठली, जे उच्च स्तरांवर विक्रीचा दबाव असल्याचे दर्शवते. या घसरणीनंतरही, बाजाराची व्यापक रचना मर्यादित श्रेणीतच आहे. तात्काळ प्रतिकार पातळी (Immediate Resistance Level) ५९१५० च्या आसपास आहे आणि या पातळीच्या वर सातत्यपूर्ण ब्रेकआउट झाल्यास ५९२५०–५९५०० पातळीच्या दिशेने तेजी येऊ शकते. दुसरीकडे, ५८६००–५८७०० पातळीचा स्तर एक महत्त्वपूर्ण आधार क्षेत्र आहे आणि ट्रेंडच्या पुष्टीसाठी यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. संस्थात्मक आघाडीवर, एफआयआयने मागील १४ सत्रांमध्ये विक्रेते राहिल्यानंतर १७ डिसेंबर रोजी निव्वळ खरेदीदार बनले आणि त्यांनी ११७१ कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या, तर डीआयआयनेही ७६८ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी करून बाजाराला पाठिंबा दिला.
सध्याची अस्थिरता आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, व्यापाऱ्यांना निवडक राहण्याचा आणि घसरणीवर खरेदी करण्याची रणनीती अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. योग्य लिव्हरेज, कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस आणि टप्प्याटप्प्याने नफा-वसुली करण्याची शिफारस केली जाते. नवीन लाँग पोझिशन्स केवळ २६१०० च्या वर सातत्यपूर्ण ब्रेकआउट झाल्यावरच विचारात घ्याव्यात, तसेच जागतिक संकेत आणि महत्त्वाच्या तांत्रिक स्तरांवर बारकाईने लक्ष ठेवावे.'






