Wednesday, December 17, 2025

सुभाष सिंग ठाकूरला २२ डिसेंबरपर्यंत कोठडी

सुभाष सिंग ठाकूरला २२ डिसेंबरपर्यंत कोठडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टार सुभाष सिंग ठाकूरला मीरा-भाईंदर, वसई-विरार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून सोमवारी अटक केली. मंगळवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर उत्तर प्रदेशातील फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अंडरवर्ल्ड क्षेत्रात सुभाष सिंग ठाकूर याच्यावर संपूर्ण भारतात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. विरारमधील बिल्डर समय चौहान यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी म्हणून सुभाष सिंग ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी बांधकाम व्यावसायिक समय चौहान याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून सुभाष सिंग ठाकूर असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी सुभाष सिंग ठाकूर याला तब्बल तीन वर्षांनंतर अटक केली आहे.

 
Comments
Add Comment