विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.


दोन दिवसांमध्ये अहवाल पाठवणे बंधनकारक




  • कोणतीही अनुचित घटना घडली, तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.

  • जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.


शिस्तभंगाची कारवाई :


हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा

Devendra Fadnavis : विरोधक पळपुटे, संसदेत चर्चा करायची त्यांच्यात हिम्मत नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल; चर्चा होऊ दिली असती तर त्यांचे पितळ उघडे पडले असते मुंबई : "विरोधी

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार