मोहित सोमण:मिशोचा शेअर सुसाट वेगात पळत आहे. युबीएस या ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला सकारात्मक प्रतिसाद आपल्या अहवालात दिल्यानंतर शेअर २०% पेक्षा अधिक इंट्राडे उच्चांकावर उसळला असल्याने मूळ आयपीओ प्राईज बँड असलेल्या १११ रुपयांच्या तुलनेत २०% उसळल्याने २१६.३४ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. त्यामुळे शेअरला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. ब्रोकरेजने दिलेल्या अहवालात कंपनीच्या फंडामेंटल आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाल्याचे म्हटले होते. कंपनीच्या खेळत्या भांडवलात सुधारणा झाली असून कंपनीचा रोख प्रवाह (Cash Flow) सुधारला असल्याचे अहवालात नमूद केल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढवली होती.
एकीकडे बँक ऑनलाईन उद्योगाच्या आर्थिक स्थिती मंदावली असताना तसेच रोख प्रवाहात घसरण सुरू असताना मिशोने मात्र आपली वाढ कायम राखण्यात यश मिळवले असल्याचे अहवालात ब्रोकरेजने म्हटले होते. कंपनीच्या आर्थिक स्थितीवर बोलतान कंपनीच्या विश्लेषकांनी म्हटले की,'मिशोचे मॉडेल नेट मर्चेंडाईज व्हॅल्यू (NMV) सीएजीर (Compound Annual Growth Rate CAGR) FY25-30e पेक्षा ३०% आहे. मार्जिन (CM) आणि समायोजित ईबीटा (Adjusted EBITDA मार्जिन) यांचा सर्वाधिक वाटा आहे. कंपनीचा दोन्ही बाबतीत एनएमव्ही (Merchandise Value NMV) FY30e पर्यंत अनुक्रमे ६.८% आणि ३.२% पर्यंत पोहोचेल.' असे कंपनीने निरिक्षणात नोंदवले आहे.
अहवालातील निष्कर्षानुसार, ब्रोकरेजचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष २५-३० पर्यंत कंपनीचे NMV ३०% CAGR ने वाढेल. त्याच कालावधीत वार्षिक व्यवहार वापरकर्ते (Average Transction User ATUs) १९९ दशलक्ष वरून ५१८ दशलक्ष पर्यंत वाढतील आणि वार्षिक ऑर्डर बूक ९.२ वरून १४.७ पर्यंत वाढेल असे म्हटले. ब्रोकरेज मते, कंपनीने लॉजिस्टिक्स कार्यक्षमता इकोसिस्टममध्ये हस्तांतरित केल्यामुळे सरासरी ऑर्डर मूल्ये (AOVs) २४७ वरून २३३ रूपयांपर्यंत कमी होतील असे अंतिमतः म्हटले. एकूणच कंपनीचा शेअर गेल्या ५ दिवसात २६.८९% उसळला होता.
कंपनीचे बाजार भांडवल सध्या ९७६३७.०८ कोटी रुपये आहे. १० डिसेंबर कंपनीचा शेअर सूचीबद्ध झाला होता तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल ७३००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. त्यामुळे गेल्या केवळ सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये मिशोच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) जवळपास २५००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिशोचा ५४२१ कोटी मूल्यांकन असलेल्या आयपीओला एकूण ७९ पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. सध्या हा शेअर त्याच्या सूची मूल्यापेक्षा सुमारे ३२% उसळला आहे.