लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाली सात वाजता सामना सुरू होणार होता. पण दाट धुक्यामुळे सामना अद्याप सुरू झालेला नाही. सध्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित सामन्यांमध्ये काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. या दोन सामन्यांत काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.






