सोलापूर जिल्हा न्यायालयाने १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली आहे. शीतपेयात गुंगीच औषध घालून तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयाने एका १३ वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.आरोपीने शीतपेयात गुंगीचं औषध घालून पीडित बालिकेला बेशुद्ध केले आणि लैंगिक अत्याचार केला होता.याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जुलै २०१९ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.विकास दिगंबर शिंदे(वय ५० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.
शीतपेयात गुंगीच औषध टाकून केला होता अत्याचार
आरोपी विकास शिंदें याने जून आणि जुलै २०१९ च्या दरम्यान 13 वर्षाच्या पीडितेस त्याच्या घरात बोलवून खाऊसाठी पैसे देतो,असे आमिष दाखवले होते.आरोपी विकास शिंदे हा पीडीत बालिकेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर वेळोवेळी शारीरीक आणि लैंगिक अत्याचार करत होता.आरोपीने पीडितेला शीतपेय थम्सअपमध्ये गुंगीचं औषध पाजले होते.शीतपेय पिल्यानंतर पीडीतेला चक्कर आली आणि त्या अवस्थेत त्याने पीडीतेवर अत्याचार केले.तसेच कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.अल्पवयीन पीडितेवर सतत दोन महिने लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती राहीली होती.ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेला त्याबाबत विचारणा केली तेव्हा,पीडितेने आरोपी विकास शिंदे याने तिच्या सोबत लाडूचे आमिष दाखवून आणि काहीतरी प्यायला देवून तिच्यावर शारीरीक आणि लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.यानंतर पीडितेच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे ताबडतोब फिर्याद दाखल केली होती.
कोर्टात पीडितेच्या आईची आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली
सदर खटल्यात डी.एन.ए.रिपोर्ट आणि पीडितेचे वय 13 वर्षे इतके लहान असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.पीडितेला काहीतरी गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर अत्याचार केला,असा सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता.या खटल्याच्या चौकशी दरम्यान न्यायालयात सरकार पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये पीडिता, फिर्यादी, डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली.






