Wednesday, December 17, 2025

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६ मार्च २०२६ रोजी होईल आणि समारोप ३१ मे २०२६ रोजी होणार आहे.

अबुधाबी येथे आयपीएल २०२६ साठी मंगळवारी मिनी ऑक्शन अर्थात छोटा लिलाव झाला. यावेळी सर्व फ्रँचायझींना अर्थात संघ व्यवस्थापनांना आयपीएल २०२६ च्या तारखांची औपचारिक माहिती देण्यात आली. बीसीसीआयने अद्याप आयपीएल २०२६ चा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलेला नाही पण स्पर्धा ६७ दिवस चालणार असल्याची कल्पना दिली आहे.

आयपीएलचा १९ वा हंगाम भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या समाप्तीनंतर सुमारे तीन आठवड्यांनी सुरू होईल आणि तो दोन महिन्यांहून अधिक काळ चालेल.

आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहू

  1. CSK :  प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, अकेल हुसेन, मॅट शॉर्ट, अमन खान, सर्फराज खान, राहुल चहर, मॅट हेन्री, झॅक फोल्कस
  2. DC : अकिब नबी, डेव्हिड मिलर, बेन डकेट, पथूम निशांका, लुंगी एन्गिडी, साहिल पारीख, पृथ्वी शॉ, कायले जेमिन्सन. पी. राज
  3. GT : अशोक शर्मा, जेसन होल्डर, ल्यूक वुड, टॉम बँटन
  4. KKR : कॅमेरुन ग्रीन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, फिन एलन, प्रशांत सोळंकी, कार्तिक त्यागी, राहुल त्रिपाठी, टीम सैफर्ट, मुस्तफिजूर रहमान, रचिन रविंद्र, आकाशदीप
  5. LSG : मुकल चौधरी, एनरिक नॉर्किया, वहिंदू हसरंगा, नमन तिवारी, जोश इंग्लिस
  6. MI : क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलकर, मयांक रावत
  7. PBKS : कूपर कोनली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विशाल निषाद
  8. RR : रवी बिश्नोई, सुशांत शर्मा, विग्नेश पत्तूर, यश राज पुंजा, रवि सिंह, अ‍ॅडम मिल्ने, कुलदीप सेन
  9. RCB : व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, विकी ओस्तवाल
  10. SRH : शिवांग कुमार , सलिल अरोरा, साकिब हुसेन, करण फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, अमन राव, जॅक एडवर्डस
Comments
Add Comment