पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे महाराष्ट्रातले थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण आहे. याच पाचगणीत लाखो रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. कोकेन प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. पाचगणी पोलिसांनी एकूण पाच लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आणि दहा जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी स्कोडा, एमजी हेक्टर कार, मोबाईलसह ४२ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पण जप्त केला आहे.

साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अलीकडेच एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतरच पाचगणीत कोकेन विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडलेले दहा जण हे मुंबईतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.महम्मद नावेद सलिम परमार (रा. भेंडी बाजार, मुंबई), सोहेल हशद खान (रा. पी.बी. मार्ग, मुंबई), महम्मद रिझवान अन्सारी, वासिल हमीद खान, अली अजगर सादिक राजकोटवाला (रा. नागपाडा, मुंबई), महम्मद साहिल अन्सारी (रा. शिलाजी टॉवर, मुंबई सेन्ट्रल), जिशान इरफान शेख (रा. भायखळा, मुंबई), सैफ अली कुरेशी (रा. मज्जीद गल्ली, मुंबई), महम्मद उबेद सिद्दिकी (रा. भेंडीबजार, मुंबई) आणि राहिद मुख्तार शेख (रा. ग्रॅन्ट रोड, मुंबई) या सर्वांना पोलिसांनी पकडले आहे. पाचगणीतल्या ड्रग्स रॅकेटचा मुंबईशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

Pranit More Ghayal : ३७० रुपयांच्या 'बिर्याणी वादा'नंतर प्रणित मोरेचा कमबॅक! नव्या शोचे नाव 'घायल'; युझर्सकडून समय रैनासोबत तुलना

मुंबई : चर्चेत राहिलेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरे (Pranit More)

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

National Handloom Day : रेखा ते आलिया भट्ट! 'राष्ट्रीय हातमाग दिना'निमित्त बॉलिवूडच्या 'या' ६ सौंदर्यवतींनी जपली भारतीय विणकाम परंपरा

मुंबई : धाग्या-धाग्यांमध्ये गुंतलेली संस्कृती आणि हातांनी साकारलेली अद्भूत कलाकुसर म्हणजेच भारताची पारंपरिक

Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस

Mini Mathur Wins Alliance : ‘अलायन्स’च्या रणांगणात मिनी माथुरचा विजय! ५० लाखांच्या बक्षिसासह पहिल्या पर्वाची ट्रॉफी केली नावावर

मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो अलायन्स ‘Alliance’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता अखेर जाहीर झाला असून, अभिनेत्री आणि होस्ट