Wednesday, December 17, 2025

पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक

पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक
पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे महाराष्ट्रातले थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण आहे. याच पाचगणीत लाखो रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. कोकेन प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. पाचगणी पोलिसांनी एकूण पाच लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आणि दहा जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी स्कोडा, एमजी हेक्टर कार, मोबाईलसह ४२ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पण जप्त केला आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अलीकडेच एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतरच पाचगणीत कोकेन विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडलेले दहा जण हे मुंबईतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.महम्मद नावेद सलिम परमार (रा. भेंडी बाजार, मुंबई), सोहेल हशद खान (रा. पी.बी. मार्ग, मुंबई), महम्मद रिझवान अन्सारी, वासिल हमीद खान, अली अजगर सादिक राजकोटवाला (रा. नागपाडा, मुंबई), महम्मद साहिल अन्सारी (रा. शिलाजी टॉवर, मुंबई सेन्ट्रल), जिशान इरफान शेख (रा. भायखळा, मुंबई), सैफ अली कुरेशी (रा. मज्जीद गल्ली, मुंबई), महम्मद उबेद सिद्दिकी (रा. भेंडीबजार, मुंबई) आणि राहिद मुख्तार शेख (रा. ग्रॅन्ट रोड, मुंबई) या सर्वांना पोलिसांनी पकडले आहे. पाचगणीतल्या ड्रग्स रॅकेटचा मुंबईशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Comments
Add Comment