रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. हा अपघात एवढा जोरदार होता की, ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अपघात बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ४५/५०० जवळ, अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. वेगाने जात असलेला ट्रक कॉलमला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला.
अपघातात सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेल्या ट्रकचा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी आय.आर.बी.ची आपत्कालीन टीम, अपघातग्रस्तांसाठीचे मदत पथक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ट्रक हटवला आणि रस्त्याच्या कडेला नेला. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.






