Wednesday, December 17, 2025

घरगुती गुंतवणूकदारांना रुपयाचा सुखद दिलासा! रूपयांचे एका सत्रात १% पातळीवर जोरदार पुनरागमन 'ही' आहे कारणमीमांसा

घरगुती गुंतवणूकदारांना रुपयाचा सुखद दिलासा! रूपयांचे एका सत्रात १% पातळीवर जोरदार पुनरागमन 'ही' आहे कारणमीमांसा

मोहित सोमण: भारतीय बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेली मोठी खरेदी व आरबीआयने डॉलर रूपया विनिमयात चालू केलेली आक्रमक विक्री या कारणामुळे रूपया थेट जवळपास १% निचांकी पातळीवरून वधारला आहे. त्यामुळे सकाळी रुपया ९०.९६ वरून ९०.१८ पातळीवर व्यवहार करत होता त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपया उसळल्याने व सावरल्याने ही पोकळी भरून काढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया दुपारी १२.०८ वाजेपर्यंत ९०.३२ पातळीवर व्यवहार करत आहे. मोठ्या प्रमाणात सुरूवातीच्या विनिमयात (Exchange) आरबीआयने आपले हस्तक्षेपाची हत्यार बाहेर काढल्यानंतर डॉलरच्या विक्रीमुळे डॉलरमधील मागणी घसरली. सकाळी डॉलर निर्देशांकात किरकोळ वाढ कायम राहिल्याने पुन्हा काही प्रमाणात रूपया पुन्हा एकदा १५ ते १७ पैशानी घसरला असला तरी विक्रमी निचांकी पातळीवरून रुपयांत सुधारणा झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तज्ञांच्या मते विनिमय व्यापारात आरबीआयने डॉलर सेल ऑफला सुरूवात केलेले नव्हते. तरीही प्रलंबित असलेल्या या कार्यवाहीला सुरूवातीला रूपयात सुधारणा झाली आहे. यासह शेअर बाजारातही आज घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या गुंतवणूकीमुळे त्याचा फायदा बाजारात होत आहे. दरम्यान अद्याप युएसमधील घरसलेली पेरोल आकडेवारीमुळे डॉलर व कमोडिटीतील अस्थिरता कायम राहू शकते.

एका अहवालानुसार बुधवारी केलेला हा हस्तक्षेप ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील हस्तक्षेप नुकताच केलेला नसून यापूर्वीही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेने डॉलर विक्रीतून हस्तक्षेप विनिमयात केला होता. गरज पडल्यास जेव्हा रुपयामधील सततच्या एकतर्फी हालचालींना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत नजीकच्या काळात तीन प्रसंगी आक्रमकपणे हस्तक्षेप केला होता.

उपलब्ध माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने स्पॉट आणि नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड (NDF) या दोन्ही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची विक्री केली आहे. ज्यामुळे दिवसाच्या व्यवहारादरम्यान तीव्र उलथापालथ झाली. बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या कठोर हस्तक्षेपाची पुनरावृत्ती होण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती.

यापूर्वी बाजारातील रुपयांच्या दरात सातत्याने घसरण झाली. तीव्र तेजीपूर्वी परदेशी निधीचा सतत बाह्य जावक (Outflow) आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरील अद्याप न झालेली स्पष्टता यामुळे डिसेंबर महिन्यात भारतीय रुपयातील दबाव वाढल्याने रूपया जवळपास २% घसरला आहे. बाजारातील रूपयांच्या या खराब कामगिरीचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या घसरणीमुळे रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारा प्रमुख चलन बनला होता.

उपलब्ध माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणूकीमधून सुमारे १८ अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत. या निधी काढण्यामुळे रुपयावरील ताण सातत्याने वाढला आहे. अमेरिकेने लावलेले ५०% शुल्क निर्यातदारांच्या डॉलरच्या आवकेला धोका निर्माण करत आहे. त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी अद्यापही कायम आहे असे बाजार तज्ञांचे मत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >