Tuesday, December 16, 2025

अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ५० जागा लढवणार?

अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ५० जागा लढवणार?

नवाब मलिक यांनी घेतली बैठक; अहवाल अजित पवारांना देणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून भाजप-शिवसेना आणि रिपाइंने युतीची घोषणा केल्यानंतर, आता राष्ट्रवादीनेही मुंबईत ५० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ५० जागा लढवण्याबाबत चर्चा झाली असून, त्याबाबतचा अहवाल बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक मंगळवारी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक हे महिन्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेत आहेत.

दि. १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला मुंबई मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागा लढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी सूपुर्द केला जाणार आहे. या बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Comments
Add Comment