आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या विक्रोळी पूर्व येथील वर्षांनगर महापालिका शाळेतील ईव्हीएम गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे वांरवार बंद पडत असून आता याठिकाणी नव्याने सी सी टिव्ही कॅमेरे तसेच फायर अलार्म सिस्टीम बसवण्यात येणार आहे.. त्यामुळे या सीसी टिव्ही कॅमेरांसह अलार्म सिस्टीम बसवण्याचे काम तातडीने होती घेण्यात आले आहे.
विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगर मनपा शाळा संकुल येथे ई.व्ही.एम गोदाम बनवण्यात आले असून येथील नविन गोदामात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी. सी. टी. व्ही. सिस्टिम तसेच फायर अलार्म सिस्टिम बसविण्याबाबत उपनिवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. या ठिकाणी जागेची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ई.व्ही.एम ची योग्य हाताळणी व सुरक्षीत साठा ठेवण्याकरिता नवीन गोदाम उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक खात्याच्या पहिल्या मजल्यावरील ई.व्ही.एम गोदामात कोणतीही सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम उपलब्ध नाही. तसेच तळमजला येथे सी.सी.टी.व्ही. सिस्टिम जी उपलब्ध आहे, ती सिस्टिम जुनी झाली आहे. येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे नवीन सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ ची ...
त्यामुळे महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावीने नव्याने निविदा प्रक्रिया राबण्यात आली आहे. यामध्ये शिवम कार्पोरेशन यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी नव्याने सीसी टिव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म प्रणाली बसवण्यासाठी तब्बल ८८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.





