Thursday, January 15, 2026

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पडझडीचा धुमाकूळ सेन्सेक्स ५३३.६० व निफ्टी १६७.२० अंकांने घसरला

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पडझडीचा धुमाकूळ सेन्सेक्स ५३३.६० व निफ्टी १६७.२० अंकांने घसरला

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. मिड,स्मॉल, बँक, प्रायव्हेट बँक, रिअल्टी, आयटी, फायनांशियल सर्विसेस या क्षेत्रीय व व्यापक निर्देशांकातील घसरणीचा फटका आज मोठ्या प्रमाणात बाजारात बसला होता अखेरच्या सत्रातही तो कायम राहिला आहे. अखेरीस सेन्सेक्स ५३३.६० अंकांने घसरत ८४६७९.८६ व निफ्टी १६७.२० अंकांने घसरत २५८६०.१० पातळीवर स्थिरावला आहे. आज मोठ्या प्रमाणात खाजगी बँकेसह बँक निर्देशांकात घसरण झाल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६८५.६३ अंकांनी घसरण झाली असून बँक निफ्टीत ४२७.४० अंकांची घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रूपयातील घसरणीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या 'सेल ऑफ' चा फटका बाजारात बसला. घरगुती गुंतवणूकदारांना कुठला नवा ट्रिगर नसल्याने अस्थिरतेतून निर्माण झालेली दबाव पातळी कायम राहिली. यासह निफ्टी विकली एक्सपायरीसह सावधगिरीचा फटकाही कायम राहिला असून कमोडिटी बाजारातही मोठ्या प्रमाणात अस्थिरता आढळली. या एकत्रित कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स निर्देशांकातील एचडीएफसी बँक, अँक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टीसीएस सारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक,भारती हेक्साकॉम, टायटन, सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

विशेष बाब म्हणजे जवळपास सपाट (Flat) पातळीवर असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) अखेरच्या सत्रापर्यंत २% घसरला असूनही बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची रोख विक्री शोषून घेण्यास घरगुती गुंतवणूकदार व बाजार अपयशी ठरला आहे. केवळ कंज्यूमर ड्युरेबल्स, व मिडिया निर्देशांकातील तेजीसह सपाट पातळीवर असलेल्या एफएमसीजीमुळे बाजाराला किरकोळ आधार मिळाला आहे.

युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीनंतर रूपया सातत्याने घसरण असताना युएस बाजारातील टेक शेअर्समध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काल आगामी पेरोल रोजगार डेटा जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध राहिल्याने युएस बाजारातील दोन बाजारात घसरण कायम राहिली होती. आज सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील आज मात्र नासडाक (०.३६%), एस अँड पी ५०० (०.६८%) निर्देशांकात वाढ झाली असून डाऊ जोन्स (०.०२%) निर्देशांकात घसरण झाली. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात घसरणीचा कल कायम राखला गेला आहे. गिफ्ट निफ्टी (०.६२%) सह जवळपास सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली आहे. केवळ जकार्ता कंपोझिट (०.४२%) निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.४६%), कोसपी (२.२९%), हेंगसेंग (१.५८%) निर्देशांकात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ किर्लोस्कर ऑईल (८.०१%), टाटा टेलिकम्युनिकेशन (५.४%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (४.८५%), लीला पॅलेस हॉटेल (४.७६%), एल टी फूडस (४.५७%), सुप्रीम इंडस्ट्रीज (४.०९%), वेदांता (३.६५%), समभागात झाली असून सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (७.७६%), अँक्सिस बँक (५.०७%), इटर्नल (४.६९%), स्विगी (४.१५%), देवयानी इंटरनॅशनल (३.६१%), सन टीव्ही नेटवर्क (३.३०%), किर्लोस्कर ब्रदर्स (३.०४%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (२.९१%), जेएसडब्लू स्टील (२.८९%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'सततच्या एफआयआयच्या विक्रीमुळे आणि जागतिक भावना कमकुवत झाल्यामुळे, भारतीय रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर सतत घसरण झाल्याने, देशांतर्गत बाजार नकारात्मक क्षेत्रात ओढले गेले. स्मॉल आणि मिडकॅप्स लार्ज कॅप्सपेक्षा मागे पडले, आयटी, धातू, बँकिंग आणि रिअल्टीमध्ये तोटा झाला, तर उपभोग समभागांना मर्यादित आधार मिळाला. चलनातील चढउतार आणि परकीय गुंतवणूकीवरील अनिश्चिततेमुळे अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका-भारत व्यापार करार आणि रुपया स्थिरीकरणातील प्रगती महत्त्वाची असेल, तर वस्तूंच्या किमती कमी होणे आणि कमाईची दृश्यमानता सुधारणे ही रचनात्मक मध्यम-मुदतीची पार्श्वभूमी प्रदान करते.'

आजच्या बाजारातील विशेषतः घसरलेल्या बँक निर्देशांकातील कामगिरीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'मंगळवारीच्या सत्रात, बँक निफ्टी सावधगिरीने बंद झाला, मंदीचा कॅन्डलस्टिक बनला आणि त्याच्या १०-दिवसांच्या आणि २०-दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) च्या खाली बंद झाला, जो अल्पकालीन दबाव दर्शवितो. आरएसआय (Relative Strength Index RSI) कमी टॉप बनवत आहे, जे कमकुवत गती आणि खरेदी शक्तीचा अभाव दर्शवते. एकंदरीत, चार्ट स्ट्रक्चर किंचित कमकुवत दिसते. निर्देशांकाला ५८८०० पातळीवर महत्त्वपूर्ण आधार आहे; याच्या खाली निर्णायक बंद झाल्यास ५८३००-५८२०० झोनमध्ये असलेल्या त्याच्या ५०-दिवसांच्या एसएमए (SMA)कडे नकारात्मक बाजू उघडू शकते. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार (Immediate Resistance) ५९३०० आणि ५९५०० पातळीवर आहे. जर निर्देशांक ५९५०० पातळीच्या वर बंद झाला तरच शाश्वत तेजीचा दृष्टिकोन सल्ला दिला जातो.'

आजच्या बाजारातील निफ्टीतील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'दिवस मंदीला अनुकूल होता कारण निफ्टी संपूर्ण सत्रात तासिक चार्टवर २०० एसएमएच्या खाली राहिला. याव्यतिरिक्त, निर्देशांक सकाळच्या उच्चांकाची पुन्हा चाचणी घेण्यात अयशस्वी झाला, जो मंदीचे पूर्ण नियंत्रण दर्शवितो. नकारात्मक बाजूने, २५८७० वरील समर्थन भंग झाले, ज्यामुळे बाजारात मंदीची भावना तीव्र झाली. अल्पावधीत, निर्देशांक २५७०० आणि त्याहून कमी दिशेने खाली सरकू शकतो. वरच्या बाजूस, २५९५०-२६००० झोन नजीकच्या काळात एक महत्त्वाचा प्रतिकार म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'

Comments
Add Comment