Tuesday, December 16, 2025

सोन्याच्या अस्थिरतेचा फायदा गुंतवणूकीत परताव्यासह घ्यायचाय? मग 'यासाठी' द वेल्थ कंपनीचा गोल्ड ईटीएफ बाजारात लाँच

सोन्याच्या अस्थिरतेचा फायदा गुंतवणूकीत परताव्यासह घ्यायचाय? मग 'यासाठी' द वेल्थ कंपनीचा गोल्ड ईटीएफ बाजारात लाँच

एनएफओ अंतिम मुदत २२ डिसेंबरला

मोहित सोमण: सध्याच्या जागतिक अस्थिरतेत सोन्यातील 'लेवरेज' घेण्यासाठी द वेल्थ कंपनी (The Wealth Company) नवा गोल्ड ईटीएफ एनएफओ बाजारात आज लाँच केला आहे. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचा फटका कमोडिटी बाजारातही कायम असताना सोन्यात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. मात्र याच अस्थिरतेचा फायदा घेऊन दीर्घकालीन सोन्यातील कमाईसाठी कंपनीने हे दीर्घकालीन आर्थिक उत्पादन बाजारात दाखल केले आहे. २२ डिसेंबरपर्यंत हा एनएफओ (New Fund Offer NFO) खुला राहणार असून त्यानंतर तो पुन्हा उघडण्यापूर्वी बंद राहिल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ९९.५% शुद्धतेसह भौतिक सोन्यात (Physical Gold) कंपनी गुंतवणूक करणार आहे. लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) या संस्थेच्या निकषांनुसार ही शुद्धता अबाधित ठेवली जाईल असे कंपनीने म्हटले. बीएसई व एनएसईवर हा एनएफओ लाँच केला जाईल. त्यामुळे त्यातील गुंतवणूकदारांना डिजिटली खरेदी विक्री या आर्थिक उत्पादनात (Financial Product) करता येणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीप्रमाणे डिजिटल सोने खरेदी विक्री करता ईपीएफमधून करता येईल.

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या सोन्याची किंमत बाजारातील भावानुसार बदलली जाईल. त्याचा मानवी हस्तक्षेप असणार नाही. यासह ही लवचिक (Flexibility) देणारी गुंतवणूक असल्याने खरेदी विक्रीसाठी कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही. गेल्या काही वर्षांत आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात ईटीएफ गुंतवणूकीत लक्षणीय वाढ झालेली आहे. गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष जतन करण्याचा खर्चात बचत, वाचलेले अतिरिक्त शुल्क, पारदर्शक जलद डिजिटल खरेदी विक्री, पारदर्शकता, कमी शुल्क आकारणीत लवचिक व्यवहार करायची सवड या कारणामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोन्यापेक्षा या प्रकारात अधिक पातळीवर वळत आहेत. याचाच फायदा देण्यासाठी वेल्थ कंपनीने हे उत्पादन बाजारात आणले.

यापूर्वीही वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने दिलेल्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. भूराजकीय बदलती परिस्थिती, सततची जागतिक अस्थिरता व मुख्य म्हणजे चलनवाढ अशा विविध कारणांमुळे शेअर बाजारासह कमोडिटी बाजारात अस्थिरता वाढली आहे. काऊन्सिलने दिलेल्या अहवालानुसार, याच कारणामुळे सोन्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने 'हेजिंग' मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे २०२६-२०२७ या संपूर्ण आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर सोन्याच्या किंमतीत १५ ते ३०% वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे या ईटीएफमधून प्रत्यक्ष सोने व सोन्याशी संबंधित असलेल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये द वेल्थ कंपनी पैसे गुंतवणार असे कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान ही गुंतवणूक 'जोखीम' (Risk) प्रवर्गात मोडत असल्याने कंपनीने यातून परतावा मिळणारच असा दावा केलेला नाही. सगळ्या सूचना व तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी असा सल्लाही तज्ञ वेळोवेळी करत असतात.

द वेल्थ कंपनी ही पॅटोमथ ग्रुपची व्यवस्थापना मालमत्ता (Asset Management) कंपनी असून कंपनीची विविध पोर्टफोलिओत १०००० कोटीहून अधिक गुंतवणूक आहे असे कंपनीने यापूर्वी स्पष्ट केले होते. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त कंपनी कॅटेगरी २ एआयएफ इन्व्हेसमेंट योजना, भारत भूमी फंड यांसारख्या विविध गुंतवणूक योजना गुंतवणूकदारांना ऑफर करते.

या एनएफओ बाबत भाष्य करताना कंपनीच्या या लाँच प्रसंगी द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापक,व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधू लुनावत म्हणाल्या आहेत की,'सोन्याचे दागिने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक आहे, असे कायमच आपल्याला सांगितले जाते. पण खरी गोष्ट अशी आहे की, जेव्हा तुम्ही हार खरेदी करता, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करत नसता तर तुम्ही खरेदी करत असता. तुम्ही कारागिराच्या कौशल्यासाठी आणि सुंदर वस्तू घालण्याच्या तुमच्या हौसेसाठी पैसे देत असता. यात खूप मोठा फरक आहे. जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खरोखरच सोन्याचा समावेश करायचा असेल, तर दागिन्यांच्या ग्राहकांसारखा विचार करणे थांबवा आणि गुंतवणूकदारासारखा विचार करायला सुरुवात करा. आणि इथेच गोल्ड ईटीएफचे काम सुरू होते. ते तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त किमतीशिवाय, आपल्या आवडीसाठी एवढे पैसे खर्च केले, या भावनिक ओझ्याशिवाय आणि कोणत्याही नुकसानशिवाय शुद्ध सोन्याचा लाभ देतात.'

गुंतवणूकीतील रिटर्न्स व भूराजकीय परिस्थितीवर भाष्य करताना द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे मुख्य धोरणात्मक अधिकारी देबाशिष मोहंती म्हणाले आहेत की,'अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीत, सोने हा भारतीय गुंतवणुकीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. द वेल्थ कंपनी गोल्ड ईटीएफद्वारे, आम्ही अचूकता, तरलता आणि गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह असे उत्पादन देत आहोत. किरकोळ खरेदीदारांपासून ते सुजाण गुंतवणूकदारांपर्यंत, बाजारातील प्रत्येक घटकासाठी सोन्यातील गुंतवणूक अधिक सोपी, कार्यक्षम आणि धोरणात्मकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.'

Comments
Add Comment