Tuesday, December 16, 2025

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातो . अनेकदा स्वतःच्या सवयी, अनुभव आणि वैयक्तिक आयुष्याबाबत तो मोकळेपणाने बोलतो. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये करण जोहरने स्वतःच्या एका विचित्र सवयीचा खुलासा केला असून, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

करण जोहरने सांगितले की तो कितीही मोठ्या, हाय-प्रोफाइल लग्नात गेला तरी तिथे कधीच जेवत नाही. अनेकदा तो लग्न समारंभातून उपाशीच घरी परततो. दरवर्षी अनेक नामांकित सेलिब्रिटींच्या आणि उद्योगपतींच्या लग्नांना उपस्थित राहत असतानाही त्याने ही सवय कायम ठेवली असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या सवयीमागचं कारण सांगताना करण म्हणाला की लग्नात जेवणासाठी लागणाऱ्या रांगा, हातात प्लेट घेऊन उभं राहणं आणि गोंधळाची परिस्थिती त्याला अजिबात आवडत नाही. “लग्नात जेवण्यासाठी उभं राहणं मला खूप विचित्र आणि अस्वस्थ वाटतं. त्यामुळे मी तिथे जेवण टाळतो,” असं करणने सांगितलं. त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

अलीकडेच करण जोहर उदयपूरमध्ये झालेल्या भारतीय-अमेरिकन उद्योगपती राम राजू मंटेना यांच्या मुलगी नेत्रा मंटेनाच्या भव्य लग्नात होस्ट म्हणून उपस्थित होता. या लग्नात रणवीर सिंग, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, वरुण धवन यांसारख्या कलाकारांनी सादरीकरण केलं, तर आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझनेही कार्यक्रमात रंग भरला.

कामाच्या आघाडीवर करण जोहरचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट “तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Comments
Add Comment