कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाच्या खोलीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये एक वकील थुंकीने कागदपत्रे उलटताना दिसत आहे. न्यायमूर्ती सिन्हा यांनी हे पाहिले आणि त्यांनी लगेच त्याबाबतची नाराजी व्यक्त करत, वकिलाला हात धुण्याचे आदेश दिले आणि इशारा दिला की जर त्याने तसे केले नाही तर त्या केस ऐकणार नाहीत.
काही क्षणानंतर, वकिलाने म्हटले, "मला माफ करा." न्यायमूर्ती सिन्हा यांनी विचारले, "तुमचा बँड कुठे आहे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे का?"
विशेष म्हणजे, न्यायालयात प्रश्नोत्तराच्या सत्रात वकील त्यांच्या कोटांसह बँड घालतात; परंतु ते वकील बँड विसरले. त्यामुळे रागावलेल्या न्यायमूर्ती सिन्हा यांनी त्या वकिलास आधी तुमचे हात धुवा. नाहीतर, मी आता हा खटला ऐकणार नाही, असे बजावले. त्यानंतर वकील हात धुवून परत आले. त्यानंतर न्यायाधीशांनी केस ऐकली.






