Tuesday, December 16, 2025

Dollar Rupees Rate: डॉलरच्या तुलनेत रूपयाची निचांकी 'परिसिमा' ९१ रूपये प्रति डॉलर होण्याकडे वाटचाल!

Dollar Rupees Rate: डॉलरच्या तुलनेत रूपयाची निचांकी 'परिसिमा' ९१ रूपये प्रति डॉलर होण्याकडे वाटचाल!

मोहित सोमण: डॉलरच्या तुलनेत रुपयाची सीमा गाठली आहे. तब्बल दुपारपर्यंत प्रति डॉलर रूपया ९०.९६ पातळीवर पोहोचला असल्याने जवळपास डॉलर ९१ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने आज गुंतवणूकदारांनी खरेदीत पण घट केली असून थोड्याच वेळात युएस पेरोल रोजगार डेटा जाहीर होईल याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या मागणीत दबाव निर्माण झाल्याने डॉलर सुरूवातीच्या सत्रातच ९०.७६ पातळीवर खुला झाला होता. आज दिवसभरात याचीच पुनरावृत्ती होत असल्याने रूपया ९०.९६ रूपयांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. यासह बाजारातील रूपयांच्या घसरणीमागे आणखी एक कारण म्हणजे युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची घोषणा झाल्यानंतर अद्याप रूपया वापसी करू शकलेला नाही.

महत्वाचे म्हणजे गेल्या ४ दिवसात रुपया मोठ्या प्रमाणात घसरला. परकीय बाजारात मात्र डॉलरच्या दरात वाढ झाल्याने आज सोन्याच्या जागतिक किंमतीत घसरण झाली आहे. याच कारणामुळे आज शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. आरबीआय वेळोवळी रूपयांच्या व्यवहारात हस्तक्षेप करत असली तरी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री घसरल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आली नाही. तरीही येणाऱ्या काळात मजबूत फंडामेंटलमुळे रूपयात पुन्हा एकदा नवा ट्रिगर येण्याची शक्यता असून तज्ञांच्या मते रूपया नजीकच्या काळात नियंत्रणात येऊ शकतो. परंतु भारतीय युएस बाजारातील करारातील बोलणीच्या अनुषंगाने अद्याप अस्थिरतेचे चटके शेअर बाजारासह रूपयालाही बसला आहे.

आजच्या विक्रमी निचांकावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' आज रुपयामध्ये आणखी मोठी घसरण अपेक्षित नव्हती, कारण नोव्हेंबर महिन्याची व्यापार आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आली आहे. शॉर्ट पोझिशन्स कव्हर करणे हे आजच्या घसरणीमागील एक कारण असू शकते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेली सततची विक्री हे एका दुष्टचक्राप्रमाणे काम करत आहे, ज्यामुळे रुपया खाली खेचला जात आहे. सामान्यतः जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा रिझर्व्ह बँक रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलर्सची विक्री करून हस्तक्षेप करते. परंतु अलीकडे रिझर्व्ह बँकेचे धोरण चलनाची घसरण होऊ देणे हे आहे. भारतातील कमी महागाई (नोव्हेंबरमध्ये ०.७१%) हेच मध्यवर्ती बँकेच्या या अहस्तक्षेपाचे कारण आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होत नाहीये.भारताची नोव्हेंबर महिन्यातील व्यापार तूट ऑक्टोबरमधील ४१.६८ अब्ज डॉलर्सवरून २४.५३ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी होणे, हे रुपयासाठी सकारात्मक आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >