Sunday, January 11, 2026

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. सोमवारी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. सदर सोन्याच्या मूर्तीची किंमत रु. १२ लाख ३९ हजार ४४० इतकी असून, दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानकडे केली आहे. ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment