भाजपमध्ये नवीन पर्व

भारतीय जनता पार्टीने नुकतेच बिहारचे कॅबिनेट मंत्री नितीन नवीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. ते आता जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल तेव्हा जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये तरुणांना संधी दिली आणि नवीन यांचा तरुण आणि कठोर मेहनती कार्यकर्ता म्हणून स्वभाव लक्षात घेऊन त्यांची या पदासाठी निवड केली. तसेच त्यांचा संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांच्या कामी आला. जे लोक नवीन यांना शाळेच्या दिवसापासून ओळखतात ते असे सांगतात, की नवीन यांच्या दृष्टीने राजकारण हे त्यांच्यासाठी कधीही महत्त्वाचे नव्हते. सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवेश हा केवळ परिस्थितीने झाला होता आणि त्यांनी कधीही राजकारणात येण्याचे ठरवले नव्हते. २००६ मध्ये त्यांचे वडील नवल सिन्हा यांचा मृत्यू झाला तेव्हा नवीन राजकारणात आले. पाटणा पश्चिमेतील बांकीपोर हा नवीन यांचा मतदारसंघ आणि तो पहिल्यापासून जनसंघाचा राहिला आहे. या मतदारसंघातून ठाकूर प्रसाद यांनी प्रतिनिधित्व केले, जे की रवीशंकर प्रसाद यांचे वडील आहेत. पण जेव्हा राजकारणात प्रवेश करण्याचा नवीन यांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांना संपूर्ण राजकारणाने व्यापून टाकले होते. राजकारणात संपूर्ण वेढले जाण्याचा अर्थ तुमचे वैयक्तिक आयुष्य वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे आणि ते नवीन यांनी अनेकदा केले आहे. कारण वैयक्तिक आयुष्यापासून प्रदीर्घकाळ दूर राहावे लागणे आणि ते नवीन यांनी आता स्वीकारले आहे.


कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन यांनी पदभार स्वीकारतील तेव्हा ते ४५ वर्षांचे आहेत आणि तुलनात्मकदृष्ट्या ते तरुण आहेत. दोन दशके त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे आणि बांकीपोरमधून ते आमदार राहिले आहेत. अर्थात आता नवीन यांची निवड करून भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण नवीन हे बिहारी आहेत. सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही बिहारमध्येच जन्मले आहेत आणि ते नंतर हिमाचलमध्ये गेले. सहसा भाजपमध्ये इतक्या तरुण नेत्याची अध्यक्षपदासाठी निवड केली जात नाही. म्हणून नवीन यांची निवड सर्वांनाच आश्चर्याचा धक्का आहे. कायस्थ असलेले नवीन हे बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. बिहारमध्ये नवीन यांची निवड त्वरित लागू करण्यात आली असून बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. नितीन नवीन यांची संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन ही निवड केली आहे, असे मानले जाते. नड्डा यांनाही अध्यक्ष बनवण्यापूर्वी त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे नवीन हेच पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे मानण्यास जागा आहे. नितीन नवीन हे पाच वेळा आमदार राहिले असून छत्तीसगढ येथून भाजपचे ते नेते होते. पार्टी विथ डिफरन्स ही उक्ती भाजपने कार्याध्यक्ष निवडीतही सार्थ ठरवली आहे. नितीन नवीन यांनी लो प्रोफाईल राहण्याबद्दल ख्याती प्राप्त केली आहे. बिहारमध्ये तरुणांना संघटनेशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले आणि त्यांच्या या कामाची पोहोचपावती त्यांना मिळाली आहे असे म्हणावे लागेल. नितीन नवीन यांच्याकडे अनपेक्षितपणे राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि हे काम ते सांभाळतील यात शंका नाही. ते पहिले बिहारी कार्याध्यक्ष असल्याने बिहारसाठी हा आनंदाचा धक्का आहे. भाजपचे सरकार सध्या बिहार आणि आंध्र प्रदेशमुळे टिकून आहे. त्यामुळे या दोन राज्यांना खूश करण्याशियवाय भाजपला पर्याय नाही, असेही बोलले जाते. त्यामुळे त्यांची निवड यातून केली की काय अशीही शंका घेण्यास जागा आहे. नितीन नवीन यांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यशैली ही भाजपच्या कार्यशैलीला जुळती आहे. पण भाजपने नेहमीप्रमाणे साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी कुणालाही कार्याध्यक्ष पदी भाजपने नेमले नाही. त्यात धर्मेद्र प्रधान आणि उत्तर प्रदेश किंवा ओडिसातून आलेल्या नेत्याची नावे घेतली जात होती. पण या सर्वांना बाजूला टाकून नितीन नवीन हे वेगळेच नाव भाजपने कार्याध्यक्ष म्हणून आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच अध्यक्ष आणि तत्सम पदांना समर्पित रूपात पाहू इच्छितो. त्या दृष्टीने नितीन नवीन यांची निवड अत्यंत सार्थ आहे असे म्हणावे लागेल.


४५ वर्षांच्या नेत्याकडे भाजपसारख्या विशाल पक्षाच्या नेत्याचे संपूर्ण दायित्व सोपवणे ही अत्यंत अवघड जबाबदारी आहे आणि हे नितीन यांनीही मान्य केले. अर्थात त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते बंगाल विधानसभा निवडणुकीचे. ते लक्षात घेऊन नितीन यांना कार्य करावे लागेल. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, की पश्चिम बंगालला अराजकतावादी सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे. पण शॉर्टकट टाळून भाजपला यश मिळवावे लागेल हेच नितीन यांनी सांगितले. भाजपमध्ये या पदासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता ती पूर्ण झाली. अर्थात भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ही नियुक्ती जाहीर केली. मान्यवर नेते या पदासाठी नजर लावून होते पण त्यांची निराशा झाली. अर्थात भाजपमध्ये लगेच कुणी सोडून जात नाही, तर तो निष्ठेने काम करत राहतो. त्यामुळे विरोधी पक्षांसारखे भाजपमध्ये होत नसते. हेही सांगून टाकावे लागेल, की भाजपची सूत्रे ज्याच्या हाती असतील ते नितीन नवीन हे पहिले बिहारी नेते असतील. त्यांच्या या अध्यक्षपदी निवडीमुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान झाला आहे असे जे मोदी यांनी म्हटले आहे ते अगदी रास्त आहे. नितीन नवीन यांना शुभेच्छा. त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्यातही २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पुन्हा सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात भाजपने १७ वे प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी यांना समोर ठेवून जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. २०१७ मध्ये भाजपने ३२५ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

मेसी मानिया

कोलकात्यातील विवेकानंद युवा क्रांती मैदानात अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेसी याचे आगमन झाल्यावर त्याला

शेतकऱ्याचं मरण

प्रयत्न करूनही काही प्रश्न जेव्हां सुटत नाहीत, तेव्हां त्यावर तात्पुरती उपाययोजना करून प्रश्न बाजूला सारावा

प्रवासी ठकले!

दहा दिवस झाले, तरी देशात हवाई प्रवास क्षेत्रात झालेला घोळ संपायची चिन्हं दिसत नाहीत. 'आता निदान पंधरा दिवसांत तरी

वंचितांचा आवाज निमाला!

डॉ. बाबा आढाव केवळ व्यक्ती नव्हती. गेली सात दशकं महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत, जिथे अन्याय होईल तिथे

नाईट ऑफ फायर डे ऑफ शेम!

एरवी गोवा हे तसे शांत राज्य. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अर्थात अगदी उत्तर प्रदेश किवा बिहारसारखी

पुतीन यांच्या भेटीचा मथितार्थ

आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑप्टिक्सला प्रचंड महत्त्व असते. भारत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भारत