बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातावर महामार्गाजवळील स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल (१५ डिसेंबर) रात्री स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.
पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करून २२ लाख रुपये जप्त केली आहे. बंडू ...
घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन चारचाकीमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली आहे. कारण अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. तसेच या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत? त्यांची ओळख काय? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही आहे. तरी पोलीस वेगाने चौकशी करत आहेत.





