Monday, December 15, 2025

Top Stocks to Buy: मध्यम व दीर्घकालीन खरेदीसाठी कुठले शेअर खरेदी कराल? पडद्यामागील माहितीसह जाणून घ्या आजचे विश्लेषकात्मक टॉप स्टॉक्स

Top Stocks to Buy: मध्यम व दीर्घकालीन खरेदीसाठी कुठले शेअर खरेदी कराल? पडद्यामागील माहितीसह जाणून घ्या आजचे विश्लेषकात्मक टॉप स्टॉक्स

मोहित सोमण: आजचे टॉप स्टॉक जाणून घेऊयात एका क्लिकवर! मजबूत फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) व मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal Financial Services) या ब्रोकरेज कंपन्यांनी चांगल्या रिटर्न्ससाठी काही शेअर खरेदीसाठी सुचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदी करावे ते पुढीलप्रमाणे -

जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -

१) Hindalco Industries- ब्रोकरेज कंपनीने या शेअरची खरेदी कारण राखण्यासाठी (Maintain Buy) बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने लक्ष्य किंमत (Target Price) ९५५ रूपयांचे गुंतवणूकदारांना दिले आहे. जेएमएफएलने चाकण येथील प्रकल्पाला भेट दिली आहे. कंपनीकडून वाढलेल्या तांत्रिक प्रगतीआधारे कंपनीवर सकारात्मक मत नोंदवले. ब्रोकरेजच्या मते, कंपनीने आपल्या उत्पादनातील ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पातळी वाढवली आहे. यामध्ये हिंदाल्कोची औद्योगिक उत्पादकता वाढली असून कंपनी महिंद्राची एकमेक पुरवठादार (Supplier) म्हणून आपले स्थान अढळ राखण्यासाठी यशस्वी ठरली.

यासह त्रैमासिक LME-संबंधित किंमत निर्धारण (LME सरासरी अधिक रूपांतरण प्रीमियम) आणि कोणत्याही नवीन ओईएम (Original Equipment Manufacturer OEM) ला सामील करून घेण्यासाठी कंपनीने चांगली कामगिरी केली. १५-२०% अंतर्गत परतावा दराची (IRR) किमान मर्यादा कंपनीची वाढली असून ब्रोकरेज मते ही आणखी वाढीची शक्यता डिसेंबरपर्यंत वर्तवली जात आहे. क्षमता विस्तारामुळे (सुमारे ८० हजार वरून १ लाख युनिट्सपर्यंत) ही वाढ होणार असून मार्च २०२७ पर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या तयारीमुळे, तसेच स्टेनलेस स्टीलऐवजी ॲल्युमिनियममध्ये १४-१५ अतिरिक्त घटक बदलण्यात OEM कंपन्यांच्या स्वारस्यामुळे ही वाढ अधोरेखित होते असे कंपनीने म्हटले. यासह कंपनीच्या पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह, HVAC फिनस्टॉक आणि औद्योगिक मूल्य साखळ्यांमध्ये हिंदाल्कोचे स्थान आणखी मजबूत होते. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीची शिफारस आम्ही कायम ठेवतो असे ब्रोकरेजने म्हटले.

२) TBO Tek- या कंपनीच्या शेअर्समध्येही ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत १९२० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीप्रमाणे, दुबईमध्ये झालेल्या TBO च्या पहिल्या गुंतवणूकदार बैठकीत लक्झरी ट्रॅव्हल मार्केटमधील कंपनीच्या जागतिक वितरणातील सामर्थ्यावर आणि उत्कृष्ट पुरवठादार संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या टुरिझम कंपनीच्या सीईओ यांनी स्पष्ट केले की, प्रीमियम एअरलाइन्स, हॉटेल्स आणि सल्लागारांसोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे एक उच्च दर्जाची सेवा देणारी ऑफर शक्य होते. ज्यामुळे ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTAs) आणि बेड बँक्सच्या तुलनेत कंपनीला फायदा मिळतो. प्रस्थापित बाजारपेठांमधील 'कन्सोर्टिया' संबंधांचे महत्त्व हा देखील चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. यासह ब्रोकरेजने आपल्या अहवालात TBO ने तंत्रज्ञानातील काही अलीकडील गुंतवणुकींवरही प्रकाश टाकला आहे ज्यामुळे ती स्पर्धात्मक प्लॅटफॉर्मपेक्षा स्वतःला वेगळे ठरवू शकते आणि खर्चही अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकत आहे. एकूणच, व्यवस्थापनाने नमूद केले की, तंत्रज्ञानातील मोठ्या गुंतवणुकी आणि विशेष पुरवठादार नेटवर्कच्या जोरावर TBO लक्झरी ट्रॅव्हल क्षेत्रातील संधी साधण्यासाठी सुसज्ज आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळातील अंदाज साधारणपणे ब्रोकरेज कायम आहे. असे असले तरी डिसेंबर २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार लक्ष्य किंमत (TP) वाढवून १९२० रुपये ब्रोकरेजने वाढवली आहे.

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -

१) Amber Enterprises- मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कंपनीने अंबर एंटरप्राईजेस शेअर खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला असून कंपनीच्या मते या शेअर्समध्ये २१% संभाव्य (Upside Potential) असून लक्ष्य किंमत ६६२६ रूपये प्रति शेअर ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. ब्रोकरेजने कंपनीने अंबर एंटरप्राईजेस कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. त्यातील निष्कर्षातील माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कामगिरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी काळात ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने रेल्वे उत्पादन व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल अशी आशा या आर्थिक वर्षात व्यक्त केली आहे.

तसेच आरएसी (RAC) उद्योगावर सध्या रेटिंग मानकांमधील बदलाचा परिणाम निश्चितच झाला आहे असे ब्रोकरेजने म्हटले. यामुळेच कंपनीच्या खर्च आणि उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. या उद्योगावर तांब्याच्या किमतींमधील तीव्र वाढीचाही परिणाम झाला आहे, ज्याचा भार ग्राहकांवर एका तिमाहीच्या विलंबानंतरच टाकला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष २६ मध्ये, अंबरला आरएसी (RAC) सेगमेंटमध्ये १०-१५% आणि इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये ३५-४०% वार्षिक वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की,आम्ही आमचे मार्जिनचे अनुमान कमी करत आहोत आणि आर्थिक वर्ष २६/२७/२८ साठी आमचे अंदाज १०%/९%/५% ने कमी करत आहोत. सुधारित DCF-आधारित दोन वर्षांच्या फॉरवर्ड लक्ष्य किंमत ८००० रुपये (पूर्वी ८४०० रुपये) सह 'बाय' (BUY) रेटिंग कायम (Maintain Buy) ठेवले आहे असेही अहवालाने अंतिमतः म्हटले आहे.

२) Simens- कंपनीच्या शेअर्समध्ये ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३१४५ रूपये (Common Market Price CMP) खरेदीसह ३% संभाव्य वाढीसह लक्ष्य किंमत ३२५० रूपये प्रति शेअर दिली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने (SIEM) आपल्या विश्लेषकांचा बैठकीत स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये चांगल्या वाढीचा कल आणि लोकोमोटिव्हची डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे मोबिलिटी सेगमेंटसाठी महसूल वाढ आणि मार्जिन प्रोफाइलमध्ये सुधारणेची शक्यता अधोरेखित केली आहे. तसेच सरकारकडून, विशेषतः रेल्वेकडून, मिळणाऱ्या ऑर्डर्सच्या वेळेबद्दल आणि खाजगी भांडवली खर्चाच्या पुनरुज्जीवनाबद्दल अनिश्चितता मात्र अद्याप कायम आहे असे अहवालात ब्रोकरेजने म्हटले. अहवालातील माहितीनुसार, मोतीलाल ओसवालने म्हटले आहे की,'डिजिटल इंडस्ट्रीजमधील कमी मार्जिन लक्षात घेऊन आम्ही आमचे अंदाज 18MFY26E/12MFY27E/12MFY28E साठी १%/४%/४% ने कमी केले आहेत. आम्हाला FY24 (सप्टेंबर अखेर) FY28 (मार्च-अखेर) या कालावधीत महसूल/ईबीटा (EBITDA) / करोत्तर नफा (PAT) अनुक्रमे मध्ये ११%/ १३%/८% च्या पातळीवर सीएजीआरने (Compound Annual Growth Rate CAGR) ने वाढ अपेक्षित आहे.

ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही 45x Dec’27E कमाईवर आधारित, ३२५० (पूर्वीच्या ३३५० वरून) सुधारित लक्ष्य किमतीसह स्टॉकवरील आमचे 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवतो. व्यापक भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन आणि मार्जिनमधील सुधारणा हे कमाई आणि मूल्यांकनाच्या रेटिंगसाठी प्रमुख चालक (Catlayst) असतील असे अहवालाने आपल्या निरीक्षणात नोंदवले.

३) Endurance Technologies- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १५% अपसाईड संभाव्य वाढीसह २६४१ रुपये सीएमपीला खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला असून कंपनीने या शेअरची लक्ष्य किंमत ३०५० रुपयांवर निश्चित केली आहे. आपल्या अहवालातील निरिक्षणात नोंदवल्या माहितीनुसार, कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डर मुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

अहवालातील माहितीनुसार ब्रोकरेजने एंड्युरन्स टेक्नॉलॉजीजच्या (ENDU) व्यवस्थापनाशी त्यांच्या प्रमुख विभागांच्या भविष्यातील दृष्टिकोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यातील निरीक्षणातील माहितीनुसार सर्व दुचाकी वाहनांवर एबीएस (ABS) अनिवार्य करण्याच्या शिफारशीवर सरकारकडून स्पष्टतेची कंपनी वाट पाहत असली तरी१) बिडकिन येथील नवीन अलॉय व्हील प्लांट; २) ड्युअल-चॅनल एबीएस आणि चेन्नईमधील नवीन ब्रेक सुविधा; आणि ३) इन्व्हर्टेड फ्रंट फोर्क्स व्यवसाय या कारणामुळे कंपनीच्या कामगिरीत मजबूत होण्याची शक्यता आहे. यासह ब्रोकरेज मते, ही कारणे भविष्यात चारचाकी वाहनांतील वाढीचा एक चालक (Catlayst) म्हणून काम करू शकतो. कंपनी या विभागाचे योगदान सध्याच्या ३०% वरून ४५% पर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

यासह अहवालानुसार, कंपनीने यापूर्वीच डाय कास्टिंग्ज, ब्रेक्स आणि ट्रान्समिशनमध्ये ऑर्डर मिळवल्या आहेत आणि सस्पेंशनमधील पहिल्या ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने संलग्न विभागांमध्ये क्षमता विकसित केली आहे, आणि सोलर डॅम्पर्स, बॅटरी पॅक असेंब्ली आणि ॲल्युमिनियम फोर्जिंगसाठी पुरवठा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्टोफरलेच्या अधिग्रहणामुळे आणि नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे, प्रतिकूल व्यापक आर्थिक वातावरण असूनही ब्रोकरेज मते, युरोपीय व्यवसायात स्थिर वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे दिलेल्या माहितीत ब्रोकरेजने म्हटले आहे की,'आम्ही आर्थिक वर्ष २५-२८ दरम्यान एकत्रित महसूल (Consolidation) /ईबीटा (EBITDA)/ करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये सुमारे १६%/१७%/१६% च्या सीएजीआरचा (CAGR) अंदाज लावतो .ब्रोकरेज कंपनीने ३०५० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह 'बाय' (BUY) कॉल रेटिंग कायम राखतो असे म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >