Monday, December 15, 2025

रूपया ९१ रूपयांच्या जवळ पोहोचला,डॉलरच्या तुलनेत रूपयात 'महाविक्रमी' घसरण 'या' कारणांमुळे!

रूपया ९१ रूपयांच्या जवळ पोहोचला,डॉलरच्या तुलनेत रूपयात 'महाविक्रमी' घसरण 'या' कारणांमुळे!

मोहित सोमण: आज रूपया- डॉलर अस्थिरतेच्या गोंधळात पुन्हा एकदा रूपया आणखी एकदा निंचाकी (All time Low) पातळीवर पोहोचला. सातत्याने युएस फेड व्याजदरातील कपातीच्या निर्णयानंतर डॉलर पातळीत दबाव कमी झाल्याने इतर देशांच्या चलनाच्या बास्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा विशेष फटका भारतीय रूपयाला बसल्याने गुंतवणूकदार आणखी हवालदील झाले. आज सत्र सुरुवातीलाच रूपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोसळल्याने रूपया थेट ९१.५५ या पातळीवर घसरला असताना दुपारी १२.३० वाजेपर्यंत रूपया ९०.७२ या महाविक्रमी पातळीवर कोसळला. शेअर बाजारातही शुक्रवारी १११४ कोटींची रोख विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली. सोन्यात काही प्रमाणात आलेली स्थिरताही डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय स्थिर होती. मात्र आज डॉलरमध्ये काही प्रमाणात किंमतीत तेजीत घसरण झाल्याने व स्थिरता आल्याने सोन्याच्या जागतिक किंमतीत दबाव निर्माण झाला.

प्रसिद्ध अहवालानुसार आतापर्यंत रूपया आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर ५.५% कोसळला आहे.यावर्षी रूपयांच्या अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर व भांडवली बाजारातून १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून टाकली ज्याचा फटका एक्सचेंज विनिमयात बाजारात बसत आहे. खासकरुन व्याजदरातील कपातीनंतरही भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अद्याप निश्चितता नसल्याने गुंतवणूकदारही अस्वस्थ आहेत. ज्याचा आणखी तोटा रूपयात दिसला.

मागील आठवड्यात आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निकालात आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचे घोषित केले होते ज्यामुळे रेपो दर आता ५.५०% वर आला. याखेरीज आरबीआयने १००००० कोटींची गुंतवणूक सरकारी बाँड खरेदीसह जाहीर केली आहे. यामध्ये बाजारात तरलता (Liquidity) वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असताना बाह्य वातावरणाचा परिणाम म्हणून रूपया घसरत आहे. यावर्षीच्या अखेरीस भारत व युरोपियन युनियन यांच्यातील करार निश्चित होईल असे म्हटले जाते. यासह भारताच्या व्यापार तूटीत (Trade Deficit) वाढ झाल्याने विनिमयावर याचा दबावही कायम राहिला.

बाजारातील तज्ञ संस्था व फॉरेक्स सल्लागार संस्था आयएफए ग्लोबलने,'मध्यम मुदतीत डॉलरच्या कमकुवतपणामुळे रुपयाची कामगिरी खालावलेलीच राहू शकते. पुढील ६ आठवड्यांमध्ये आम्हाला ८९.६०-९०.६० ही पातळी अपेक्षित आहे' असे म्हटले आहे.

रुपया कमकुवत होत असल्याने, आयातदार त्यांच्या जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी घाई करत आहेत, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढत आहे. त्याच वेळी निर्यातदार चांगल्या विनिमय दराच्या आशेने डॉलरची विक्री थांबवत आहेत. या असंतुलनामुळे रुपयावर आणखी दबाव येत आहे असे म्हटले जाते. रुपयामधील तीव्र चढउतार रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचे मानले जात आहे.

त्यामुळे असे मानले जाते की जोपर्यंत भारत-अमेरिका व्यापार करारावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रूपयातील अस्थिरता कायम राहू शकते. याच कारणामुळे वाढलेल्या हेजिंगचा परिणामही बाजारात होऊ शकतो. बाजार तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे व्यापार संबंधित काही सकारात्मक घडामोडी होत असल्याने अधूनमधून आधार मिळू शकतो. सध्या रुपया ८९.५० ते ९१.०० या विस्तृत मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >