धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला करत त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही, हेच अधोरेखित होते.


मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तेव्हा स्थानिक गुंडांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी उलट त्यांच्यावरच हल्ला केला. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून काही गुंड पोलिसांशी वाद घालताना आणि थेट त्यांच्यावर हात उचलताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. ज्यात काही गुंडांनी थेट पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या वर्दीवर हात टाकला.



घडलेल्या घटनेनंतर कांदिवली पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच, अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय

सीईटी नोंदणीत ‘आधार’चा अडथळा

नावातील विसंगतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा

अंधेरीत सोसायटीवर गोळीबार, आरोपी फरार; गुन्हा दाखल, तपास सुरू

मुंबई : अंधेरीत लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे

मुंबई महापालिकेत यंदाही महापौरांविना झेंडावंदन

महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक संपन्न होवून मतदारांनी

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मंडाळे ते