Monday, December 15, 2025

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार
मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायक मेटे यांची बैठक झाली. यात महानगरपालिका निवडणुकीत लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसंग्राम लढेल, निवडणूक रिंगणात उतरेल; असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे. ही माहिती शिवसंग्रामचे मुंबई उत्तर, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राम भोईटे यांनी दिली आहे. नुकत्याच नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका झाल्या असून आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसंग्रामची महत्वपूर्ण बैठक शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीसाठी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अनुषंगाने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली आणि आगामी महानगरपालिका निवडणुका शिवसंग्राम लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडी च्या वतीने लढणार असल्याची घोषणा यावेळी डॉ. मेटे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे राम भोईटे यांनी स्वागत केले आणि मुंबई ठाणे भिवंडी आणि नवी मुंबई येथील ज्या प्रभागात शिवसंग्राम चे प्राबल्य आहे. त्या जागा शिवसंग्राम लढणार असल्याचे शिवसंग्रामचे मुंबई उत्तर, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राम भोईटे यांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा