डॉ. सर्वेश सुहास सोमण । samrajyainvestments@gmail.com
भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बरेच चढ-उतार दिसून आले. उच्चांकी शिखरावर पोहोचलेला देशांतर्गत बाजार उच्चांकापासून घसरला पण आठवड्याच्या शेवटी बाजाराने रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा मोठी उभारी घेतली. पुढील आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसू शकतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत-रशियामध्ये संरक्षण, व्यापार, आरोग्य, शिक्षण, माध्यमे आणि आर्थिक क्षेत्र यासह १६ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. रशियाने भारताला सतत आणि अखंड इंधन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशिया भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला इंधन पुरवठा सुरू ठेवण्यास तयार करणार असल्याचे सांगितले. या आठवड्यातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणजे की यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक, जी ९ डिसेंबरला झाली आणि पुन्हा १९ डिसेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ०.२५% दर कपात केल्यानंतर बाजार आता पुन्हा दर कपातीच्या शक्यतेने उत्साहित दिसत आहेत. डिसेंबरमध्ये आणखी २५ बेस पॉइंट दर कपात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या रिकव्हरी नंतर निर्देशांक निफ्टी ची दिशा आणि गती पुन्हा तेजीची झाली असून निफ्टीची २५९५० ते २५९२० ही खरेदीची पातळी आहे, तर २५८५० ही महत्त्वाची ट्रेंड रिव्हर्सल पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या ट्रेंड रिव्हर्सल पातळीच्यावर आहे तोपर्यंत निफ्टीतील तेजी टिकून राहील. शेअर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक शेअर्स हे तांत्रिकदृष्ट्या चार्टनुसार मंदीचे संकेत देत आहेत त्यामुळे सध्या नवीन शेअर्स खरेदी करण्यापेक्षा होल्ड कॅश इन हॅण्ड हे धोरण योग्य ठरेल. भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बरेच चढ-उतार दिसून आले. उच्चांकी शिखरावर पोहोचलेला देशांतर्गत बाजार उच्चांकापासून घसरला पण आठवड्याच्या शेवटी बाजाराने रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा मोठी उभारी घेतली. पुढील आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसू शकतात.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी (आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसी) हा (आयपीओ) आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये (ग्रे मार्केट) या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. यामुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओचा जीएमपी (जीएमपी) २५० रुपयांचा टप्पा ओलांडून गेला आहे. हा आयपीओ पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. हा आयपीओ १२ डिसेंबर रोजी खुला झाला होता. चांदीच्या दराने सध्या परताव्याच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी चांदीच्या किमती ६४.३१ डॉलर प्रति औंस या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. भारतातही अनेक शहरांमध्ये चांदीने २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीच्या दरात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे परतावा देण्याच्या बाबतीत तिने सोने आणि शेअर बाजार या दोघांनाही मागे टाकले आहे.
मागच्या आठवडाभरात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अगदी ९० रुपयांच्याही पार गेला आहे. ९०.४६ रुपयांचा नीच्चांक या आठवड्यात प्रस्थापित झाला. त्यानंतर भारतीय गुंतवणूकदार आता अमेरिकन फेडरल बँकेच्या रेपोदर बैठकीवर लक्ष ठेवून आहेत. कारण, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं २५ अंशांची कपात केली तर त्याचा भारतीय रुपयावर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. भारतीय रुपया ८९.८८ पर्यंत सावरला आहे. आणि फेडरल बँकेचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी महागाईवर सकारात्मक भाष्य केलं, तर भारतीय रुपयालाही त्याचा फायदा होऊ शकेल. अमेरिकन डॉलरमध्ये आलेली शिथिलता आणि कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रित झाल्यामुळे सध्या भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सावरत आहे. पण, भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारी करार अजूनही अनिश्चित आहे. त्यातच डोनाल्ड ट्रंप यांनी भारतातून येणाऱ्या तांदळावर आयात शुल्क वाढवण्याची भाषा केली आहे. पण, आता १० डिसेंबरपासून दोन्ही देशांची शिष्टमंडळं या व्यापारी करारावर बोलण्यासाठी तीनदिवसीय बैठक घेणार आहेत. तिथे या करारावर तोडगा निघाला, तर रुपयाचा विनिमय दरही थोडाफार आटोक्यात येऊ शकेल. अशा सकारात्मक वातावरणात फेडरल बँकेकडून झालेली दर कपातही भारतासाठी फायद्याची असेल. ‘फेडरल रिझर्व्ह अमेरिकन व्याज दरात २५ अंशांची कपात करतील असा अंदाज आहे. याचा भारतीय रुपयाला नक्कीच फायदा होईल. कारण, एकतर भारतीय शेअर बाजार सुधारेल आणि अमेरिकेतील महागाई कमी झाली तर भारतीय मालासाठी तिथून येणारी मागणी वाढेल आणि भारताकडून होणारी आयात वाढली तर रुपयासाठी ते नक्कीच फायद्याचं ठरेल,’ असं आनंद राठी समुहातील अर्थतज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक सुजन हजरा यांनी बोलून दाखवलं. अमेरिकेत व्याजदर कमी झाले तर तिथून भारतात येणारा पैसा वाढेल, असं यामागचं सरळसोपं गणित आहे. आणि त्यातून रुपया सुधारायला मदतच होणार आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)