लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या नावाची घोषणा झाली. १३ डिसेंबर रोजी झालेल्या नामांकन प्रक्रियेत केवळ पंकज चौधरी यांचेच नामाकन दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.






