संसदेत आज सादर होणार विधेयक
नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सोमवारी संसदेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मांडत आहे. या ऐतिहासिक पावलांमुळे देशातील अणुऊर्जा क्षेत्र पहिल्यांदाच खासगी कंपन्यांसाठी खुले होईल. आतापर्यंत हे क्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली होते. मंत्रिमंडळाने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली असून सोमवारी संसदेत त्यावर चर्चा होईल. या विधेयकाचे उद्दिष्ट खासगी कंपन्यांना अणुऊर्जा निर्मितीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणे आहे. यामुळे भारताला १०० मेगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्यास मदत होईल.






