मोहित सोमण: नॅशनल कमोडिटी अँड डेरिएटिव एक्सचेंज (NCDEX) कंपनीला म्युच्युअल फंड गुंतवणुक प्राप्त करण्यासाठी सेबीने (Security Exchange Board of India SEBI) तत्वतः मान्यता दिल्याचे आज घोषित केले आहे. कंपनीने आज ही घोषणा करताना इक्विटी व इक्विटी बेंचमार्क डेरिएटिव गुंतवणूक गोळा करण्याची मान्यता प्राप्त केल्याने याचा फायदा गुंतवणूकदारांनाही होणार आहे. खासकरून ग्रामीण व निमशहरी भागात इक्विटी गुंतवणूकीत वाढ होण्यासाठी काही प्रयोजन म्हणून कंपनीने ही योजना आखली होती. अद्याप टीयर ४, टीयर ३ शहरांत अपेक्षित वाढ इक्विटी अथवा म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नाही यासाठी हे पाऊल उचलताना कंपनीने हे पाऊल उचलले. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,' प्रस्तावित प्लॅटफॉर्मचा उद्देश, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये कमी रकमेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सारख्या वैशिष्ट्यांद्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीची पोहोच वाढवणे हा आहे. तसेच, अतिरिक्त व्यवसायाची संधी देऊन सध्याच्या ट्रेडिंग सदस्यांना पाठिंबा देणे आणि इक्विटी सेगमेंट सुरू होण्यापूर्वी कॅश-मार्केटचा आधार (Base) तयार करणे हा देखील याचा उद्देश आहे.' असे म्हटले.
एनसीडीईएक्स (NCDEX) कंपनीची उपकंपनी (Subsidiary) असलेल्या एनसीएएल (National Commodity Clearing Limited NCCL) कंपनी ही म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन व क्लिअरिंग या मूलभूत गोष्टीसाठी जबाबदार असणार आहेत. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात एनसीडीईएक्सवर या शेतकी कमोडिटीचा व्यासपीठावर म्युच्युअल फंडाचे वितरण इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून करण्यासाठी नियामकांनी मान्यता दिली होती. आता थेट गुंतवणूकदारांना या म्युच्युअल फंडात गुंतवणूक या व्यासपीठावर करता येणार आहे असे समजत आहे.
यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात एनसीडीईएक्सने आपल्या सेवांचा विस्तार करण्याच्या आणि भारतातील मुख्य प्रवाहातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजशी थेट स्पर्धा करण्याच्या योजनेचा भाग म्हणून डेरिव्हेटिव्ह्जसह इक्विटी-संबंधित उत्पादनांमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी प्राथमिक मंजुरी सेबीकडून मिळवली होती. २००३ साली या कमोडिटी व कमोडिटी डेरिएटिव व्यासपीठाची स्थापना झाली होती. एनसीडीईएक्स (NCDEX) हे सेबी नियंत्रित स्टॉक एक्स्चेंज असून भारतातील सर्वात आघाडीचे कृषीविषयक कमोडिटी एक्सचेंज बाजार हणून ओळखले जातो.
याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एनसीडीईएक्सचे एमडी आणि सीईओ डॉ. अरुण रास्ते म्हणाले आहेत की,' इक्विटी लाँच होण्यापूर्वी म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म लाँच करणे हा एक धोरणात्मक आणि वेळेवर घेतलेला निर्णय आहे. नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हे सर्वात सोपा आणि सुरक्षित सुरुवातीचा पर्याय आहे आणि आमचा विश्वास आहे की येथूनच भारताचा इक्विटी प्रवास सुरू होतो. एनसीडीईएक्सचे म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म ग्रामीण आणि व निमशहरी भागातील बचतीला चालना, वाढती उत्पादकता व नियंत्रित गुंतवणूक मार्गांमध्ये रूपांतरित करण्यासाठी व इक्विटीमध्ये अधिक सहभागासाठी एक चांगला मार्ग तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कमी रकमेच्या एसआयपी आणि सुरक्षित एक्सचेंज आधारित पायाभूत सुविधांसह हे आम्हाला भारतासाठी बहु-मालमत्ता (Mutli Asset) व्यासपीठ प्रदान करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.






