Monday, December 15, 2025

नोव्हेंबरमध्ये अस्थिरतेतही भारताच्या निर्यातीत १० वर्षातील 'सर्वोच्च' वाढ,वित्तीय तूटही घसरली 'ही' आहे आकडेवारी!

नोव्हेंबरमध्ये अस्थिरतेतही भारताच्या निर्यातीत १० वर्षातील 'सर्वोच्च' वाढ,वित्तीय तूटही घसरली 'ही' आहे आकडेवारी!

मोहित सोमण: भारतासाठी आणखी एक उत्साहाचा क्षण बाजारात साजरा केला जात आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात भारताच्या व्यापारी तूटात घसरण होऊन अस्थिरतेच्या काळात निर्यातीत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर वित्तीय तूट ऑक्टोबर महिन्यातील ४१.६८ अब्ज डॉलर तुलनेत नोव्हेंबर महिन्यात २४.५३ अब्ज डॉलरने घसरली आहे. तसेच मर्चंडाईज निर्यातही १० वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गेल्या नोव्हेंबर तुलनेत या नोव्हेंबरमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६४.०५ अब्ज डॉलरवरून वाढत ७३.९९ अब्ज डॉलर या रेकोर्ड ब्रेक पातळीवर वाढ नोंदवली आहे.

यासह एकूणच वित्तीय तूटीतही झालेली घसरण ही सोने, तेल, कोळसा इत्यादी कमोडिटीतील आयातीत घसरण झाल्याने नोंदवली गेली आहे. यासह वाढलेल्या व्यापारातील लक्षणीय वाढीमुळे निर्यात नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली. अस्थिरतेच्या काळातही व्यापार निर्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३१.९४ अब्ज डॉलरवरून नोव्हेंबर महिन्यात ३८.९४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सहाजिकच आयातीत इयर ऑन इयर बेसिसवर ६३.८७ अब्ज डॉलरवरून ६२.५५ अब्ज डॉलरवर घसरण झाली. आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील आयातीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या १७.२५ अब्ज डॉलर तुलनेत ही वाढ नोव्हेंबर महिन्यात १७.९६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र यातील निष्कर्षानुसार आयातीत वाढ झाली असली तरी सजावट क्षेत्राने इयर ऑन इयर बेसिसवर ३२.११ अब्ज डॉलरवरून ३५.८६ अब्ज डॉलरवर वाढ (Growth) नोंदवली आहे.

मर्चंटडाईज आयातीत इयर ऑन इयर बेसिसवर ६२.६६ अब्ज डॉलर तुलनेत या नोव्हेंबरमध्ये ६३.८७ अब्ज डॉलरवर वाढ नोंदवली आहे. यासह सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील निर्यातीत मोठ्या प्रमाणात भारताने वाढ नोंदवली आहे. ही वाढ एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ मध्ये झाली असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील तुलनेत वाढ झाल्याचेही सरकारने स्पष्ट केले. महिन्यातील आधारे (Month on Month MoM) ही वाढ एप्रिल महिन्यातील १.३९ अब्ज डॉलर तुलनेत १.६२ अब्ज डॉलरवर वाढ झाली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वाढ मात्र १.३४ अब्ज डॉलर व १.२१ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.

एकूणच या अहवालातील माहितीवर भाष्य करताना वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले आहेत की,'आमची विक्रमी निर्यात ३८.१३ अब्ज डॉलर्स झाली आहे, जी गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात आम्ही कधीही ३८ अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला नव्हता.

तसेच, एक सकारात्मक बाब म्हणजे आयातीत १.८८% घट झाली आहे. आयातीचा एक कल असतो, जो सामान्यतः सकारात्मक असतो, परंतु या महिन्यात तो -१.८% आहे. याकडे लक्ष द्यावे लागेल असेही ते म्हणाले आहेत.

केवळ वस्तूंच्या व्यापारातील तूट गेल्या वर्षीच्या ३१.९२ अब्ज डॉलर्सवरून कमी होऊन २४.५३ अब्ज डॉलर्सवर आली आहे. त्यामुळे या महिन्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. या मोठ्या वाढीमागील प्रमुख कारणे पाहिल्यास,तपशीलवार सादरीकरणात अधिक माहिती दिली जाईल, परंतु त्यापैकी काही म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रात २३.८% वाढ, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत ३९% वाढ आणि रत्न व आभूषणे क्षेत्रात २७.८% वाढ आहे असे सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >