Sunday, December 14, 2025

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विधान भवन मुंबई येथे होणार आहे.

हिवाळी अधिवेशनात ७२ तास ३५ मिनिटे कामकाज झाले. अन्य कारणांमुळे १० मिनिटे वाया गेली. प्रतिदिन सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे होते. या अधिवेशनात एकूण ७ हजार २८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले, त्यापैकी २१५ प्रश्न स्वीकारण्यात आले, उत्तरीत झालेले प्रश्न २७ होते. विधानसभेत एकूण १८ शासकीय विधेयक मांडण्यात आली, त्यातील १६ विधेयक संमत करण्यात आली.

विधान परिषदेत ४ विधेयक संमत करण्यात आली. अधिवेशनात १ हजार ८६७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील २९९ लक्षवेधी स्वीकारण्यात आल्या, तर ७० सूचनांवर चर्चा झाली. अधिवेशनात आमदारांची अधिकाअधिक ९०.९८ टक्के उपस्थिती होती, अल्प उपस्थिती ४३.८५ टक्के होती. एकूण सरासरी उपस्थिती ७५.९४ टक्के होती, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा