उद्यापर्यंत ब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन नवीन क्रॉसओव्हरचे काम सुरू असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने १५ डिसेंबरपर्यंत प्री-एनआय आणि एनआय ब्लॉक जाहीर केला आहे. तळोजा पाचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगदरम्यान सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी काही गाड्या विलंबाने सोडणार आहेत.
या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हे बदल प्रभावी राहणार आहेत. काही गाड्यांच्या उशीरा निघणार आहेत. मडगाव-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ही गाडी ३० मिनिटे उशिरा सुटणार असून तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस ६० मिनिटांनी, तर मंगळुरू–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ५० मिनिटांनी उशिरा धावणार आहे. त्याचबरोबर, १४ डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ६० मिनिटांच्या विलंबाने धावेल, तर १५ डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस (१०१०३) ३० मिनिटांच्या विलंबाने निघेल. पनवेल–कळंबोलीदरम्यान सुरु असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी मध्य रेल्वेने १६ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त ब्लॉक जाहीर केला आहे. रविवार (१४ डिसेंबर) आणि मंगळवार (१६ डिसेंबर) या दिवशी मध्यरात्री १.३० ते ३ .३० दरम्यान पावर ब्लॉक असेल. या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार असून एकूण १२ मेल–एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.






