पुणे : जुन्नर वनविभागात बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी रुपये दिले आहेत. त्यातून पिंजरे खरेदी करण्यात आले आहेत. वनविभागाने या पिंजऱ्यात ६८ बिबटे पकडले आहेत. कमी काळात एवढे बिबटे वनविभागाने पकडल्यामुळे बिबटे व मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. जुन्नर वनविभागात बिबट्यांच्या हल्ल्यात २०२५-२६ या वर्षांत ५ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांना ६५ लाख रुपये मदत, तर ५ नागरिक जखमी झाले असून त्यांना २ लाख १८ हजार ९६४ रुपये व १ हजार ६५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.






