Saturday, December 13, 2025

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे पॅरोडी आणि कॉमिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता त्यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत आपल्या पहिल्या वेबसीरिजएकाकी’सह पदार्पण केले आहे. हॉरर-कॉमेडी थ्रिलरवर आधारित या सीरिजचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा क्षण आणखी खास ठरतो कारण देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वर आशिष यांच्या कामाची प्रशंसा केली. आशिषसाठी ही दाद त्यांच्या सर्जनशील प्रवासातील एक मोठा अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Comments
Add Comment