नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)चेे नाव बदलण्यात आले आहे. या योजनेचे नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने किमान वेतनातही सुधारणा केली आहे, ती प्रतिदिन २४० रुपये केली आहे. ही योजना प्रथम राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ (नरेगा) म्हणून सुरू करण्यात आली. नंतर, तत्कालीन सरकारने त्यात सुधारणा करून तिचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) असे ठेवले. तेव्हापासून, तिचे नाव मनरेगा ठेवण्यात आले. आता, केंद्रातील भाजप सरकारने त्यात बदल करून त्याचे नाव पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे ठेवले आहे. कामाच्या दिवसांची संख्या वाढविण्यात आली आहे.






