Saturday, December 13, 2025

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी आणि किनारपट्टीची सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच १५ हाय स्पीड गस्ती नौका राज्यात दाखल होणार असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी विधानसभेत दिली.

मंत्री राणे म्हणाले की, सध्या गस्तीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे लाकडी बोटी आहेत. या बोटींमधून परराज्यातून आलेल्या मच्छिमार नौकांचा पाठलाग करून त्यांना पकडणे शक्य होत नाही. त्यामुळे हाय स्पीड नौका घेण्यात येत आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त घातली जात आहे. त्यामाध्यमातून परराज्यातील नौका, अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण आणले असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिली

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >