Saturday, December 13, 2025

गौतम अदानी यांचे पुतणे प्रणव अदानी सेबीकडून 'दोषमुक्त' इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात क्लीनचीट!

गौतम अदानी यांचे पुतणे प्रणव अदानी सेबीकडून 'दोषमुक्त' इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात क्लीनचीट!

प्रतिनिधी: उद्योगपती गौतम अदानी यांचा पुतण्या प्रणव अदानी यांना इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात सेबीने क्लिनचीट दिली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रणव अदानी यांना सेबीने 'कारणे दाखवा' नोटीस इनसायडर ट्रेडिंग प्रकरणी दिली होती. एसबी एनर्जी (SB Energy) नामक कंपनीचे अधिग्रहण (Acquisition) करण्यासंदर्भात किंमत प्रभावी माहिती (Price Sensitive Information) बाजारातील गुंतवणूकदारांना दिल्याबद्दल सेबीने ही कारवाई केली होती. प्रथमदर्शनी सेबीने या प्रकरणात तथ्य आहे का हे पाहण्याचे ठरवल्याने सखोल चौकशी करण्याचे ठरवले व त्यानुसार चौकशी समिती नेमून आपला अहवाल सादर केला आहे. या चौकशीत कुठल्याही प्रकार इनसायडर ट्रेडिंगचा आढळला नसून यामध्ये प्रणव अदानी व त्यांचे साथीदार कुणाल शहा, नृपाल शहा यांची आढळली नसल्याचे सेबीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

आपल्या ५० पानी आदेशात अदानी यांच्याविरोधात प्रथमदर्शनी नियमाचे विशेषतः (Unpublished Price Sensitive Information UPSI) उल्लंघन केले असल्याचे आढळून आले नसल्याचे म्हणून कुठलाही पुरावा सापडला नसल्याचेही सेबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तुफान वाढ झाली होती. थेट ३ ते ३.३०% शेअर वाढल्याने अदानी ग्रीन कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर पोहोचला होता. ११८८.७५ वरून शेअर वाढत १२४३.६५ रूपयांवर पोहोचला होता. मे महिन्यात अदानी समुहाने एसबी एनर्जीचे अधिग्रहण केले होते.

दरम्यान सेबीला असे आढळले की, एसबी एनर्जीच्या अधिग्रहणाबद्दलच्या बातम्या त्या दिवशी आधीच प्रकाशित झाल्या होत्या म्हणजेच ती माहिती आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध होती. त्यामुळे एकप्रकारे नियमांचे उल्लंघन झाले असले तरी त्यात अदानी यांचा हस्तक्षेप स्पष्ट झालेला नाही. यूपीएसआय (UPSI) ही माहिती घोषणेपूर्वी अप्रकाशित असणे सेबी कायद्यानुसार आवश्यक अहते‌ सेबीने असा निर्णय दिला की, बातम्यांद्वारे व्यापकपणे उपलब्ध असलेली माहिती इनसाइडर ट्रेडिंगचा आधार बनू शकत नाही.

शिवाय, सेबीने असे निरीक्षण नोंदवले की, १९ मे रोजीच्या औपचारिक घोषणेपेक्षा बातम्यांचा एजीईएलच्या (Adani Green) शेअरच्या किमतीवर अधिक मोठा परिणाम झाला होता. अधिकृत घोषणेच्या दिवशी ३.७५% वाढीच्या तुलनेत, १७ मे रोजी शेअरने ५%आणि १८ मे रोजी ४.८४% वाढ नोंदवत अप्पर सर्किट गाठले.

यावरून हे सूचित होते की, बाजाराने आधीच सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सेबीने असा निष्कर्ष काढला की, १६ मे रोजी दुपारी ३:२५ वाजता बातमी प्रकाशित झाल्यानंतर ती माहिती यूपीएसआय राहिली नाही. शाह बंधूंचे व्यवहार १७ मे रोजी, माहिती सार्वजनिक झाल्यानंतर झाले असल्याने, सेबीने असा निर्णय दिला की हे व्यवहार इनसाइडर ट्रेडिंग मानले जाऊ शकत नाहीत. परिणामी, नियामक संस्थेने पुन्हा एकदा पुष्टी केली की १६ मे रोजीच्या कॉलमध्ये यूपीएसआयची देवाणघेवाण झाली नव्हती आणि ते व्यवहार खरे होते.

एका स्वतंत्र आदेशात, सेबीने अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमधील कथित इनसाइडर ट्रेडिंगच्या प्रकरणात विनोद बाहेती, तरुण जैन, राजतारू एंटरप्राइजेस आणि एमसी जैन इन्फोसर्व्हिसेस यांच्यावरील इनसाइडर ट्रेडिंगच्या आरोपांमधूनही त्यांना दोषमुक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >