मोहित सोमण:बिगर भाजप राज्यात यंदा सर्वाधिक वाढ ग्राहक महागाईत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार,सर्वाधिक महागाई यंदा इयर ऑन इयर बेसिसवर केरळ, कर्नाटक, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब राज्यात झाली आहे. तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात तर महागाईत घसरण झाली. इयर ऑन इयर बेसिसवर ही घसरण गेल्या नोव्हेंबर महिन्यातील १९७.७ आकड्यांचा तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात १९७.० पातळीवर घसरण झाली आहे. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Implementation) ही आकडेवारी जाहीर केली. तसेच या आकडेवारीतील माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती सुधरूढ असली तरी नोव्हेंबर महिन्यात यंदा ग्राहक किंमत महागाईत (Consumer Price Index CPI) गेल्या महिन्याच्या तुलनेत ०.७१% वाढ नोंदवली गेली. ही हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजेच महागाई वाढलेल्या भाजीपाला व अन्नधान्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याने झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. मास, मासे, इंधन, अंडी, भाज्या, मसाले यांच्यातील किंमतीत झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून ही ४६ बेसिस पूर्णांकाने (BPS Points) झाली आहे. गेल्या बँक ऑक्टोबरपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही वाढ १११ बेसिस पूर्णांकाने अन्न महागाईत (Food Inflation) झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही गेल्या महिन्यात महागाईत आठ महिन्यातील सर्वाधिक घसरण झाल्याचा परिणाम म्हणून यावेळी महागाई नियंत्रित दरात वाढल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय ग्रामीण भागातील व शहरी भागातील महागाईतही किरकोळ वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील हेडलाईन इन्फ्लेशन (शीर्ष) महागाईत ऑक्टोबर महिन्यातील -०.२५% तुलनेत यंदा मात्र ०.१०% वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक अन्न महागाईत (Consumer Food Inflation Index CFPI) महिन्याच्या आधारावर मात्र घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही आकडेवारी -४.०५% असून ती ऑक्टोबर महिन्यात -४.८५% होती. शहरी भागात महागाईतही वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात ती ०.८८% वरून १.४०% पातळीवर वाढली आहे.
इंधनाच्या बाबतीतही वाढ झाली आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात ती २.३२% झाली आहे जी ऑक्टोबर महिन्यात १.९८% होती. शिक्षणाच्या बाबतीत इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यातील महागाई दर ३.३८% घसरण झाली आहे जी ऑक्टोबर महिन्यात ३.८१% होती. एनएसओ (National Statistics Office NSO) किंमतींचा डेटा NSO, MoSPI च्या फील्ड ऑपरेशन्स विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे साप्ताहिक वेळापत्रकानुसार वैयक्तिक भेटी देऊन, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक ११८१ गावे आणि १११४ शहरी बाजारांमधून गोळा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात, संस्थेने १००% गावे आणि ९८.४७% शहरी बाजारांमधून किमतीचे नमुने गोळा करून विश्लेषण केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये नोंदवलेल्या बाजारनिहाय किमती ग्रामीण भागासाठी ८९.०८% आणि शहरी भागासाठी ९२.४४% होत्या असे म्हटले.






