Saturday, December 13, 2025

एसबीआयचे ग्राहक आहात? मग खुषखबर! आता कर्जाचा हप्ता स्वस्त होणार, एसबीआयकडून 'हे' सुधारित व्याजदर जाहीर

एसबीआयचे ग्राहक आहात? मग खुषखबर! आता कर्जाचा हप्ता स्वस्त होणार, एसबीआयकडून 'हे' सुधारित व्याजदर जाहीर

मोहित सोमण: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने नुकतीच ग्राहकांना खुशखबर दिली आहे. आता तुम्ही एसबीआय (State Bank of India) ग्राहक असेल तर तुमच्या कर्जाच्या व्याजदरातील हप्त्यात कपात होणार आहे. याविषयी एसबीआयने आपल्या अधिकृत निवेदनात पुढील माहिती स्पष्ट केली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचे स्पष्ट केले. ज्याचा फायदा आता ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरबीआयने बँकाना आदेश दिले होते. या सुचनेनुसार एसबीआयने आपल्या बेस इफेक्टसह व्याजदरात बदल केल्याचे आज स्पष्ट केले. दिनांक १५/१२/२०२५ म्हणजेच परवापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाईल हे बँकेने स्पष्ट केले.

नव्या माहितीनुसार, एसबीआयनेही आपल्या दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्याने ईबीएलआर (External Benchmark Linked Rate EBLR) हा ७.९०% वर आला आहे. यापूर्वी हा दर ८.६५% होता. तर ओव्हरनाईट मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड (MCLR) दरात बँकेने फेरबदल केल्याने हा नवा दर ७.९०% वरून ७.८% वर आला आहे. एक दिवसासाठी ७.९०% वरून ७.८५% व एक वर्षासाठी हा दर ८.७५% वरून ८.७०% पातळीवर आला‌ .

तथापि, बँकेने इतर मुदत ठेवींवरील व्याजदर कायम ठेवले आहेत, जे ठेवी जमा करण्यावरील दबावाचे संकेत देतात.

बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आता व्याजदर किती? त्याचा फायदा कुणाला?

४४४ दिवसांच्या अमृत वृष्टी या विशिष्ट मुदत योजनेचा व्याजदर १५ डिसेंबरपासून ६.६०% वरून ६.४५% पातळीवर आला असल्याचे बँकेने स्पष्ट केले.

इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देखील १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या आपल्या कर्ज दरांमध्ये कपात जाहीर केली आहे. बँकेने आपला एक्सटर्नल बेंचमार्क लोन रेट (EBLR) - विशेषतः रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) २५ बेसिस पॉइंट्सने ८.३५% वरून ८.१०% कमी केला आहे. याव्यतिरिक्त बँकेच्या मालमत्ता देय व्यवस्थापन समितीने (ALCO) तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतींसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्सची कपात मंजूर केली आहे. या सुधारणांमुळे ज्यांचे कर्ज या बेंचमार्कशी जोडलेले आहे अशा विद्यमान आणि नवीन कर्जदारांचे समान मासिक हप्ते (EMIs) कमी इंडियन ओव्हरसिज बँकेने कमी केले असे म्हटले आहे.

'गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या किरकोळ ग्राहकांना फायदा होईल. मध्यम लघू सूक्ष्म उद्योग (MSME) आणि कॉर्पोरेट कर्जदारांनाही त्यांच्या निधीच्या खर्चात कपात अनुभवायला मिळेल ज्यामुळे ग्राहकांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा (Working Capital Requirments) पूर्ण होतील आणि व्यवसायाच्या वाढीस मदत होईल असेही ओव्हरसीज बँकेने यावेळी नमूद केले आहे. याआधी बँक ऑफ बडोदानेही या आठवड्यात दरकपातीच्या निर्णयानंतर आपल्या मार्केट लिंक आधारित व्याजदरात ७.९०% पातळीवर कपात केली होती. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने केलेल्या दरकपातीत दर ८.१५% वरून ७.९०% पातळीवर खाली आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >