Thursday, March 26, 2026

'निफ्टी' टेक्निकल विश्लेषण: 'या' कारणामुळे आज निफ्टी २६१९०-२६३०० पातळीच्या आसपास स्थिरावण्याचे तज्ञांचे संकेत

'निफ्टी' टेक्निकल विश्लेषण: 'या' कारणामुळे आज निफ्टी २६१९०-२६३०० पातळीच्या आसपास स्थिरावण्याचे तज्ञांचे संकेत

मोहित सोमण: आज शेअर बाजारात जबरदस्त संकेत मिळतच आहेत. वित्तीय पतधोरण समितीने (FOMC) २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्यानंतर युएस व्याजदर ३.५० ते ३.७५% पातळीवर आला ज्याचा फायदा शेअर बाजारात झाला असला तरी अनिश्चितता कायम राहू शकते. मात्र तूर्तास बाजारात टेक्निकली तेजी दिसत आहे. काल युएस फेड व्याजदरात कपात झाल्यानंतरही आर्थिक व्यापक कारणांमुळे आशियाई शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी भारतीय गिफ्ट निफ्टी ०.५०% पटीत तेजीत राहिला. कालची तेजी आजही कायम राखण्यात बाजारात यश आल्याने आजही सुरुवातीच्या सत्रातील निफ्टी पोझिशन चांगले संकेत देत आहेत. तज्ञांच्या मते निफ्टी ५० हा २६१९० ते २६३०० पातळीवर स्थिरावू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. निफ्टीतील संकेत अपवर्ड मुमेंट दिसत असल्याने या २६१९० ते २६२०० पातळीवर स्थलांतर करत राहिल असे तज्ञांचे मत आहे. तर प्रतिकार (Resistance) २६००० ते २६०५० पातळीवर राहू शकतो असे म्हटले जाते.

याविषयी भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल २५६९० आसपासच्या पातळीपासून वर चढउतार अपेक्षित रेषांवर होती परंतु २५९०० च्या जवळ येताना थांबल्यामुळे आपण पुन्हा मजबूत चढ-उताराच्या मार्गावर परतलो आहोत की नाही याबद्दल काही शंका कायम आहे. आपण दिवसाची सुरुवात २६१९० च्या अपेक्षेने करू. पुढे जाण्यास आणि २५९७७ च्या वर तरंगण्यास असमर्थता किंवा २५८५४ पातळीच्या खाली थेट घसरण ही चढ-उताराच्या गतीमध्ये तोटा दर्शवू शकते.' असे म्हटले आहे.

दरम्यान डॉलरच्या कमी झालेल्या दबावामुळे डॉलर सातत्याने वाढत असल्याने युएस बाजारात आणखी पाठिंबा मिळाला ज्या कारणाने रूपया ९०.५६ या निचांकी पातळीवर घसरला होता. याच कारणामुळे व रूपयांच्या अवमूल्यनामुळे गेले दोन दिवस परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. ज्याचा फटका निफ्टीतील हेवी वेट शेअर्समध्ये पडलेला दिसला. मात्र या घसरत्या परदेशी गुंतवणूकीला आसरा म्हणून घरगुती गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या गुंतवणूकीचा मिळाला आहे. डिसेंबरपासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १४८४५ कोटीहून अधिक रक्कम बाजारातून काढून घेतली असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी ३६०९७ कोटींची निव्वळ खरेदी बाजारात केल्याने बाजारात मोठा आधार मिळाला.

याचाच हवाला देत जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक वर्तनाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये स्थिर गुंतवणूक, जी गेल्या तीन महिन्यांत सातत्याने २९००० कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे एफआयआय विरुद्ध डीआयआय यांच्यातील संघर्षात डीआयआयना बळकटी मिळाली आहे आणि डीआयआयना एफआयआयकडून सतत होणारी विक्री आत्मसात करण्यास सक्षम केले आहे. निरोगी एसआयपी प्रवाहाच्या संदर्भात, विशेषतः जेव्हा अर्थव्यवस्था चांगली चालत असेल आणि कमाई वाढीची शक्यता सुधारत असेल तेव्हा एफआयआयना सतत विक्री करणे आणि बाजारात उच्च शॉर्ट पोझिशन राखणे कठीण होईल. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की रुपयाचे अवमूल्यन, सतत एफआयआय विक्री, अमेरिका-भारत व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यात विलंब आणि चालू एआय व्यापार हे सर्व बाजारावरील तात्पुरते ताण आहेत. बाजाराची दिशा ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कमाईची वाढ आणि हे आर्थिक वर्ष २७ साठी आशादायक दिसते. डिसेंबरमध्ये आतापर्यंत, एफआयआयनी एक्सचेंजेसद्वारे १४८४५ कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली आहे. या कालावधीत डीआयआयने ३६०९७ कोटी रुपयांची खरेदी केल्याने या विक्रीच्या आकड्याला पूर्णपणे मागे टाकण्यात आले आहे. भारतात वाढ आणि उत्पन्नाची शक्यता उज्ज्वल असताना सतत विक्री करणे हे शाश्वत धोरण नाही. यामुळे बाजाराला आधार मिळू शकतो.'

मात्र तज्ञांच्या दृष्टीने बोलताना निफ्टी ५० ला २६००० ते २६०५० पातळीवर म्हणजेच २६१८० पातळीखाली आधार मिळेल असे चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे बाजार विश्लेषक आकाश शहा यांचे मत आहे. त्यांनी यावर म्हटले आहे की,' निफ्टी ५० साठी, तीन सत्रांच्या घसरणीनंतर काल निर्देशांकाने पुन्हा गती मिळवली. तात्काळ आधार आता २५७५०-२५८०० च्या आसपास आहे आणि खोलवर आधार (Deep Support) २५५०० पातळीच्या जवळ आहे. वरच्या बाजूस (Upside) प्रतिकार (Resistance) २६०००-२६०५० पातळीच्या आसपास अपेक्षित आहे. २६०५० पातळीच्या वरचा व्यापार आणखी खरेदीला प्रोत्साहन देऊ शकतो, ज्यामुळे निर्देशांक २६३०० च्या दिशेने जाऊ शकतो. तोपर्यंत, इंट्राडे स्विंग्स नियंत्रित राहू शकतात.

बँक निफ्टी बाबतीत बोलताना बँक निफ्टी देखील किंचित सकारात्मक खुल्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. शहा यांच्या मते, प्रमुख आधार (Main Support) ५८९००-५९००० पातळीच्या जवळ दिसत आहे, तर प्रतिकार (Resistance) ५९५०० च्या आसपास आहे, त्यानंतर मानसिकदृष्ट्या ६०००० पातळी येईल. ५९५०० पातळीच्या वर एक निर्णायक हालचाल ६००००-६०२०० पातळीच्या दिशेने मार्ग मोकळा करू शकते, परंतु ५९००० धरण्यात अयशस्वी झाल्यास एकत्रीकरण (Consolidation) होऊ शकते.

काल बाजारात अस्थिरता मात्र तुलनात्मकदृष्ट्या कमी राहिली होती. आजही कालप्रमाणे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) नकारात्मक आहे याचा फायदा बाजारात स्थिरतेत होऊ शकतो. यावर बोलताना शहा पुढे म्हणाले आहेत की,'अस्थिरता कमी राहिली आहे, इंडिया VIX कमी (टीन) श्रेणीत आहे, ज्यामुळे नियंत्रित इंट्राडे हालचाल आणि आक्रमक स्थितीऐवजी रणनीतिक व्यापारासाठी अनुकूल वातावरण सूचित होते. पार्श्वभूमी पाहता, बाय-ऑन-डिप्स दृष्टिकोन योग्य राहतो. व्यापारी दोन्ही निर्देशांकांवर आधार क्षेत्रांजवळ पोझिशन्स जमा करण्याचा विचार करू शकतात आणि स्टॉप-लॉस कडक ठेवू शकतात. प्रचलित श्रेणी-बाउंड रचनेत प्रतिकार पातळीजवळ आंशिक नफा बुक करणे शहाणपणाचे आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा